आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्यातील धामणी(लोणी) येथील म्हाळसाकांत खंडोबा मंदिर येथील मंगल कार्यालयात ३१ विवाह सोहळे झाले संपन्न !!!

आंबेगाव तालुक्यातील धामणी(लोणी) येथील म्हाळसाकांत खंडोबा मंदिर येथील मंगल कार्यालयात ३१ विवाह सोहळे झाले संपन्न !!!

मंचर : पुणे,नगर व नाशिक जिल्ह्यातील भाविकांचे श्रध्दास्थान व कुलदैवत असलेल्या धामणी (तालुका आंबेगांव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थानाच्या मंदिरासमोर लोकवर्गणीतून बांधण्यात आलेल्या “कुलस्वामी” हाॅलमध्ये मागील दोन वर्षात (२०२२ व २०२३)तीस साक्षीगंध,साखरपुडा आणि विवाह सोहळे संपन्न झाले असल्याची माहीती ग्रामस्थ व खंडोबा देवाच्या सेवेकरी मंडळीनी दिली.

श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान येथील कुलस्वामी हाॅल पंचक्रोशीतील भाविकांच्या व ग्रामस्थाच्या मुलामुलींच्या लग्नकार्याला व धार्मिक कार्यक्रमाला विनामूल्य देण्याचा महत्वपूर्ण निर्णय धामणी ग्रामस्थांनी घेतलेला आहे.त्यानुसार या हाॅलमध्ये दोन वर्षात ३० विवाहसोहळे संपन्न झाले असून २०२४ या नवीन वर्षात १फेब्रुवारीला धामणी येथील भगत कुटुंबिय व रानमळा कडूस (तालुका खेड) येथील शिंदे कुटुंबिय यांचा साक्षीगंधाचा ३१वा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

धामणी (तालुका आंबेगाव) येथील श्री दादाभाऊ भागूजी भगत यांची नात व श्री गणेश दादाभाऊ भगत यांची कन्या चिं.सौ.का.अंकीता व रानमळा कडूस ( तालुका खेड ) येथील श्री नवनाथ भिकाजी शिंदे यांचे चिंरजीव किरण यांचा साक्षीगंधाचा कार्यक्रम संपन्न झाला.चिंरजीव किरण व कन्या अंकीता हे दोघेही उच्चविद्याभूषित अभियंता आहेत. यावेळी पहाडदर्‍याचे सरपंच मच्छिंद्रशेठ वाघ,खडकवाडीचे सरपंच अनिलशेठ डोके,सुभाष तांबे,निवेदक गणपत हरी विधाटे,किसनराव रोडे,सुभाष सोनवणे,गणपत नानाभाऊ विधाटे आणि भगत आणि शिंदे कुटुंबिय व पाहुणे मंडळी ग्रामस्थ उपस्थित होते.

या हाँलच्या शेजारी देवाच्या दर्शनासाठी व मंदिरात धार्मिक कुलधर्म कुलाचार कार्यक्रम व देवकार्य करण्यासाठी येणार्‍या भाविकांसाठी व विवाह सोहळा कार्यक्रमासाठी येणार्‍या वर्‍हाडी मंडळीसाठी भव्य भोजन हाॅल,वधूवर कक्ष,स्वच्छतागृहे व आकर्षक प्रवेशद्बार बांधण्यात येणार असून त्याचे काम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहीती ग्रामस्थ व खंडोबा देवस्थानांचे मुख्य पुजारी दादाभाऊ भगत,प्रभाकर भगत शांताराम भगत व सुभाष तांबे,प्रभाकर भगत,धोंडीबा भगत,पांडुरंग भगत,नामदेव भगत,राजेश भगत,खंडू भगत,राहूल भगत यांनी यावेळी दिली.

धामणी ग्रामस्थांच्या विनामूल्य हाँल उपलब्ध करुन देण्याच्या विशेष सामाजिक निर्णयाचे गावडेवाडी,महाळूंगे पडवळ,गुंजाळवाडी,तळेगांव ढमढेरे कडूस,कुरकूटवाडी येथील ग्रामस्थांनी स्वागत करुन आम्ही या उपक्रमात सहभागी होणार असल्याचे धामणी ग्रामस्थांना कळवले आहे.

नवी मुंबईचे माजी उपमहापौर श्री अशोकराव गावडे,जेष्ठ नेते ज्ञानेश्वरमाउली गावडे,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी आयुक्त श्री दिलिप गावडे,उद्योजक संदीप गावडे(नाशिक),धर्माजी गावडे,रामदास गावडे तसेच रहाटणी ( पिंपरी चिंचवड) येथील उद्योजक श्री किरणशेठ खुळे व चाकण येथील उद्योजक श्री मारूतीशेठ कौटकर यांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून मंदिराच्या जिर्णोध्दाराच्या पुढील कामाचे पूर्ततेसाठी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.