आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीराजकीय

शिरूर लोकसभा मतदार संघाचे प्रथम खासदार श्री.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून, श्री भैरवनाथ पतसंस्थेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे(पारगाव) येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप!!

शिरूर लोकसभा मतदार संघाचे प्रथम खासदार श्री.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून, श्री भैरवनाथ पतसंस्थेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे(पारगाव) येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप!!

शिरूर लोकसभा मतदार संघाचे प्रथम खासदार, शिवसेना उपनेते श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून,भैरवनाथ पतसंस्थेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे(पारगाव) तसेच शिंगवे गावातील साकोरे मळा,गाढवे मळा येथील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले गेले.

केवळ नफा कमावणे हाच उद्देश डोळ्यासमोर न ठेवता, सामाजिक बांधिलकी जपत भैरवनाथ पतसंस्था परिवाराने शैक्षणिक बाबतीतही नेहमीच पुढाकार घेतला आहे. दहावी,बारावी, विविध स्पर्धा परीक्षा यांत प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेने नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. या शिवाय शालेय विद्यार्थ्यासाठी हस्ताक्षर स्पर्धा, किल्ले बनवा स्पर्धा, निबंध स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,काव्य वाचन स्पर्धा संस्थेने यशस्वीरित्या आयोजीत केल्या आहेत. या पुढील काळातही संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष श्री.शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था विद्यार्थ्यासाठी विविध शैक्षिणक उपक्रम राबवणार असल्याचे संस्थेचे संचालक श्री.हनुमंत तागड यांनी सांगितले.

या प्रसंगी बाळासाहेब गोरडे, मिनीनाथ वाव्हळ, अमोल वाव्हळ, विकास गाढवे,नथू पाटील गोरडे, अनिल वाव्हळ,प्रवीण गोरडे, वैभव वाव्हळ,शरद गोरडे, गणेश गोरडे, पवन डोके, बाबाजी गाढवे सर, लोकरे सर, शेजवळ सर,वळसे सर,वाव्हळ मॅडम उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गाढवे सर यांनी केले. तर अमोल वाव्हळ व मिनिनाथ वाव्हळ यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.