आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ज्ञानेश्वरवस्ती (जारकरवाडी) येथील चिमुकल्यांनी लुटला बालदिंडी सोहळ्याचा आनंद!!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ज्ञानेश्वरवस्ती (जारकरवाडी) येथील चिमुकल्यांनी लुटला बालदिंडी सोहळ्याचा आनंद!!

सध्या आषाढी वारीचा सोहळा संपूर्ण राज्यात संपन्न होतो आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. याच पायी दिंडी सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव आज समस्त जारकरवाडीकरांनी अनुभवला.

पारंपारिक पोशाखात डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या विद्यार्थिनी, हिंदू धर्माचे प्रतीक असणाऱ्या भगव्या झेंड्याची पताका हाती धरून माऊली-माऊली, विठ्ठल-रखुमाई चा नामघोष करत प्रत्यक्ष पंढरीच्या वारीचा अनुभव या विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना दिला.

शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाई संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, यांची वेशभूषा करत सर्व उपस्थित त्यांना भक्तिरसात चिंब केले.

याप्रसंगी शाम बढेकर,सुरेश विधाटे, लक्ष्मण बढेकर, शांताराम बढेकर, किसन बढेकर,महादेव बढेकर, बाळू विधाटे, मल्हारी रोडे पुजारी, रामदास बढेकर आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मुलांमध्ये विज्ञानासोबतच अध्यात्माची ही गोडी निर्माण व्हावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याची माहिती गाजरे मॅडम, टाव्हरे मॅडम यांनी दिली.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.