आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीराजकीय

मेंगडेवाडीकरांना विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही -शिवसेना उपनेते,मा.खा.शिवाजीराव(दादा)आढळराव पाटील

मेंगडेवाडीकरांना विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही -शिवसेना उपनेते,मा.खा. शिवाजीराव(दादा)आढळराव पाटील

गणेशोत्सवानिमित्त शिवसेना उपनेते, मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथे गणरायाचे सपत्नीक दर्शन घेतले.त्यांच्या शुभहस्ते आरती संपन्न झाली.

मेंगडेवाडी(ता.आंबेगाव)येथे गणेश चतुर्थी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहाची सांगता आज काल्याच्या किर्तनाने झाली.यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ग्रामस्थांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच मेंगडेवाडीकरांना विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले.

यावेळी राज्याचे सहकारमंत्री श्री.दिलीपरावजी वळसे पाटील यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना सोबत घेऊनच मेंगडेवाडी देवस्थानला “क” दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले.

या प्रसंगी मा.जि.प.उपाध्यक्ष अरुणभाऊ गिरे, मा.जि.प.उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपजिल्हाप्रमुख सुनिलभाऊ बाणखेले, पं.स.सदस्य रविंद्रजी करंजखेले, सरपंच बाळासाहेब मेंगडे, युवासेना जिल्हा समन्वयक सुनिल गवारी, गणेश देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष भरत मेंगडे,उपाध्यक्ष भास्कर मेंगडे, जिजाभाऊ मेंगडे, भरत फल्ले, चेअरमन तुकाराम भोर, दिलीप रणपिसे, देवस्थानचे विश्वस्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.