आरोग्य व शिक्षण

धामणी (ता.आंबेगाव ) येथे श्री म्हाळसाकांत खंडोबा देवाच्या मानाच्या काठ्यांची मिरवणुक,मानाच्या काठीच्या मानकर्‍यांनी जपला पारंपारीक सोहळा!! 

धामणी (ता.आंबेगाव ) येथे श्री म्हाळसाकांत खंडोबा देवाच्या मानाच्या काठ्यांची मिरवणुक.

मानाच्या काठीच्या मानकर्‍यांनी जपला पारंपारीक सोहळा.

धामणी (ता.आंबेगांव)येथील कुलस्वामी श्री म्हाळसाकांत यात्रेचा माघ वद्य प्रतिपदेच्या दुसर्‍या दिवशी (सोमवारी – दिः०६)) यात्रोत्सवाची सुरुवात निरनिराळ्या गावातील मानकर्‍याच्या पारंपारिक नवसाच्या काठीच्या मिरवणूक सोहळा पारंपारिक वाद्याच्या गजरात व सदानंदाचा येळकोटचा जयघोष करुन व भंडारा उधळून हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.मागील दोन वर्षे कोरोनामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत या मानाच्या काठ्याची मानकरी मंडळीनी मिरवणूक काढलेली होती यंदा मानाच्या काठीच्या मानकर्‍यांचा व भाविकांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.देवाच्या मानाच्या काठ्याचे मानकरी सर्व राजगुरु मंडळी (अवसरी खुर्द)पंचरास मंडळी(संविदणे)घोडे आणि घोडेकर मंडळी(कवठे येमाई)वाळुंज मंडळी (वाळूंजनगर-लोणी)आगरकर मंडळी (पाबळ)नरके मंडळी (तळेगांव ढमढेरे)ही आंबेगाव शिरुर तालुक्यातील नवसाच्या काठीच्या मानकर्‍याची कुळे समाविष्ठ असल्याचे देवाचे मुख्य पूजारी दादाभाऊ भगत व सेवेकरी तांबे,भगत वाघे व वीर मंडळीनी सांगितले. या सर्व कुळांनी संकटाच्या काळातही या पारंपारीक सोहळ्याचा वारसा आजतागायत जपल्याचे काठीचे मानकरी राजगुरु मंडळीनी यावेळी सांगितले. राजगुरु,पंचरास,घोडे, घोडेकर,वाळुंज,आगरकर,आणि नरके या मानाच्या काठीचे मानकरी मानाची काठी घेऊन आपल्या भाविकांसह हालगी,डफडे,ढोलकी,ताशा, सबळ,सनई , तुतारी या पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूकीने देवाच्या म्हाळसाई प्रवेशद्वाराजवळ आले या मुख्य महाद्वारावरील देवाच्या घोड्याला मानाच्या काठ्या टेकवण्यात येऊन सदानंदाचा येळकोट हा जयघोष करत भंडार्‍याची उधळण करण्यात येऊन मानाच्या काठीच्या सोहळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी देवाच्या काठीच्या मानकर्‍यांचा देवस्थानाचे व ग्रामस्थाच्या वतीने मानाचे श्रीफळ व फेटा बांधून भगत वाघे मंडळीनी सत्कार केला पारगांव पोलीसानी यावेळी चोख बंदोबस्त ठेवलेला होता दरवर्षीप्रमाणे यात्रेच्या दुसर्‍या दिवशी होणारे भेदीकांचे सवाल जवाब, हालगी वाद्य स्पर्धा,कुस्त्याचा आखाडा,लोकनाट्य तमाशा,या कार्यक्रमांना रसिकांनी मोठी गर्दी केलेली दिसत होती.दुसर्‍या दिवशी देवाच्या दर्शनासाठी महिलांच्या रांगा लागलेल्या होत्या.धामणीच्या यात्रेत पाहुण्यारावळ्यांना व घरातील मंडळीना जिलेबी,भजी,शेवचिवडा,शेवरेवडी पाहुणचार म्हणून आनंदाने खाऊ घातली जात असताना दिसत होते. रसवंती गृहात हॉटेलात व लहान मुलाना खेळण्याची दुकाने व आकाशी पाळण्यात बसण्याची झुंबड व लगबग होती.महिला व शेतकरी मंडळी शेतीऊपयोगी अवजारे खरेदी व गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताना दिसत होती .

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.