आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथील घोडकाना येथे गतिरोधक बसवण्याची ग्रामस्थांची मागणी!!

जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथील घोडकाना येथे गतिरोधक बसवण्याची ग्रामस्थांची मागणी!!

आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडी गावातील घोडकाना येथे गतिरोधक बसवण्याची आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मंचर-लोणी रस्त्यावर जारकरवाडी चा घोडकांना आहे. या ठिकाणाहून पारगाव, मंचर,लोणी,जारकरवाडी कडे जाता येते. घोडकाना या चौकात रस्ता अरुंद आहे. शिवाय याच ठिकाणाहून तीन वेगवेगळ्या दिशेने रस्ते जातात. लोणीकडून येणारी वाहने व मंचर कडून येणारी वाहने यांना हा रस्ता अचानक अरुंद झाल्याने समोरच्या वाहनाचा अंदाज येत नाही. लोणीकडून येणाऱ्या रस्त्याला उतार असल्याने वाहने सुसाट जातात. त्याचप्रमाणे मंचर करून येणारी वाहने देखील सुसाट वेगाने येत असतात. मात्र अरुंद रस्त्यामुळे समोरून आलेले वाहन अचानकपणे दिसून येत नाही. परिणामी या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. या वाहनांचा वेग नियंत्रित करता यावा यासाठी या परिसरात गतिरोधक बसवण्याची मागणी जारकरवाडी ग्रामस्थांनी केली आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.