आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्यातील तुकानाना चौक, पिंपळगाव (खडकी) ते निरगुडसर रस्त्याला खड्डेच खड्डे!!

पुणे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तात्काळ खड्डे न बुजवल्यास ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा !!

 

आंबेगाव तालुक्यातील तुकानाना चौक, पिंपळगाव (खडकी) ते निरगुडसर रस्त्याला खड्डेच खड्डे!!

पुणे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तात्काळ खड्डे न बुजवल्यास ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा !!

आंबेगाव तालुक्यातील तुकानाना चौक पिंपळगाव(खडकी) ते निरगुडसर या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. सदर रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत खराब झाला असून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाला व शालेय विद्यार्थ्यांना खूप मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

पावसाळ्यात मोठ्या मोठ्या खड्डयात पाणी साचून राहिल्यामुळे वाहतूक करणाऱ्या लोकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पिंपळगाव(खडकी) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्याची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे जीवघेणे अपघात होण्याचे प्रकार ह्या रस्त्यावर वारंवार घडत आहेत. या रस्त्याच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत ७० लक्ष रुपये निधी मंजूर असूनही पावसाळ्याचे कारण पुढे करत पुणे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने दिवाळीनंतर काम केले जाणार असल्याचे सांगून टाळाटाळ केली जात आहे.

हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा रस्ता असल्याने पुणे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने रस्ता दुरुस्तीचे काम करणे आवश्यक आहे. प्रशासनाने यावर तात्काळ कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर यांनी दिला आहे.

यावेळी पिंपळगाव(खडकी) गावचे महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामदास गंगाराम बांगर, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल बांगर, शिवसेना शाखाप्रमुख कैलास पोखरकर, युवासेना उपतालुकाप्रमुख राहुल पोखरकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते अनिल पोखरकर पाटील, अशोक बांगर, विठ्ठल पोखरकर माडीवाले, सुरेश बांगर, युवानेते श्रीकांत पोखरकर, अमोल पोखरकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.