आरोग्य व शिक्षण

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडदे वस्ती डोंगरगाव शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न!!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडदे वस्ती डोंगरगाव शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न!!

जि प प्रा प्राथमिक शाळा गडदे वस्ती या ठिकाणी शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी सात वाजता मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख श्री मोहन भालचिम सर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल डोमाळे शामराव गडदे उपस्थित राहिले या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले कार्यक्रमामध्ये विविध गाणी देशभक्तीपर गीते हिंदी मराठी चित्रपटांमधील गाणी मोठ्या उत्साहात साजरी केली या कार्यक्रमांमध्ये इयत्ता पहिली ते चौथी आणि विशेष अंगणवाडी चे सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले होते या कार्यक्रमासाठी महिला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गडदे सर आणि आभार प्रदर्शन रवींद्र दिवटे सर यांनी केले याच कार्यक्रमांमध्ये गडदे व्यवस्थेतील मागील सलग 13 वर्ष कार्यरत असलेले शिक्षक श्री रवींद्र दिवटे सर यांची बदली झाली त्यानिमित्त निरोप समारंभ व त्यांच्या जागेवर नव निर्वाचित नियुक्त झालेली श्री संदीप गारकर सर यांचे स्वागत करण्यात आले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.