आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

एस.टी.सेवा सुरळीत करा अन्यथा विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करणार!! धामणी(ता.आंबेगाव) गावच्या सरपंच सौ.रेश्मा अजित बोऱ्हाडे यांचा एस.टी. महामंडळाला इशारा!!

एस.टी.सेवा सुरळीत करा अन्यथा विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करणार!!

धामणी(ता.आंबेगाव) च्या सरपंच रेश्मा बोऱ्हाडे यांचा एस.टी. महामंडळाला इशारा!!

राजगुरूनगर ते धामणी लोणी या मार्गावरील गेली महिन्याभरापासून एस.टी. सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून त्याचा मोठा फटका शालेय विद्यार्थी,कामगार,जेष्ठ नागरिक यांना बसतो आहे. या अगोदर बऱ्याचदा महामंडळाला निवेदन देऊन देखील तात्पुरती सुधारणा केली जाते पण परत तोच प्रकार घडत आहे त्यामुळे अक्षरशः सर्वजण वैतागले असून जर पुढील काही दिवसांत एस टी सुरळीत झाली नाही तर विद्यार्थ्यांना घेऊन रस्त्यावर आंदोलन करणार असल्याचे धामणी गावच्या सरपंच रेश्मा बोऱ्हाडे यांनी सांगितले.

सकाळी खेड,चाकण या ठिकाणी कामाला जाणारे लोक, त्यानंतर शाळकरी मुलं, जेष्ठ नागरिक हे सर्रास एस टी चा वापर प्रवासासाठी करतात. परंतु गेली काही दिवस सर्वांचीच गैरसोय होत असून त्यामुळे सर्वांनाच याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या विषयावर राजगुरूनगर आगाराशी संपर्क केला असता त्यांनी एस टी बस सी.एन.जि.करण्यासाठी गेल्या असून त्या आल्यावरच सेवा सुरळीत होईल असे सांगितले. परंतु महामंडळाने काही बस या सहलीसाठी देखील दिल्या आहेत . त्यामुळे सहलीपेक्षा सामान्य माणसाची गैरसोय होत असेल तर प्राधान्य कशाला द्यावे हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे असे मत शिरदाळे सरपंच जयश्री तांबे यांनी व्यक्त केले. त्वरित सर्व एस.टी.बस सुरळीत कराव्यात अशी मागणी प्रवासी आणि विद्यार्थ्यनकडून केली जात आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.