के.के.वाघ युनिव्हर्सल स्कूल भाऊसाहेब नगर येथे वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न!!

के.के.वाघ युनिव्हर्सल स्कूल भाऊसाहेब नगर येथे वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न!!
नाशिक (प्रतिनिधी )- निफाड तालुक्यातील भाऊसाहेब नगर येथील के.के.वाघ शैक्षणिक संस्था संचलित, के.के.वाघ युनिव्हर्सल स्कूल व के.के.वाघ प्राथमिक विद्याभवन येथे वार्षिक क्रीडा स्पर्धा दि.३० व ३१जानेवारी २०२५ दरम्यान संस्थेच्या मैदानात उत्साहात संपन्न झाल्या.
यावेळी प्रमुख अतिथी प्रा.श्री यशवंत ढगे(सल्लागार), प्राचार्य श्री .बाळासाहेब मोंढे,श्रीमती योगिता पवार,विद्या गंगावने , क्रीडा शिक्षक सागर डोखळे आदीसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इयत्ता नववीचे विद्यार्थी सिद्धेश आवारे व सोहम पुरकर यांनी केले.
यावेळी विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.यात क्रिकेट, कबड्डी, ५०मीटर,१०० मीटर, २०० मीटर धावणे, कोन-रिले, डॉज-बॉल, रस्सी- खेच, अडथळा शर्यत अशा साहसी मैदानी क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला.