आरोग्य व शिक्षणसामाजिक

शाळांच्या सर्वांगिण विकासासाठी समाजातील दानशूर व्यक्तींची भूमिका महत्त्वाची!! – बाळासाहेब घुले

शाळांच्या सर्वांगिण विकासासाठी समाजातील दानशूर व्यक्तींची भूमिका महत्त्वाची!! – बाळासाहेब घुले

शाळेच्या शैक्षणिक,भौतिक व गुणात्मक विकास होत असताना समाजातील दानशूर व्यक्तींची महत्त्वाची भूमिका असते. जिल्हा परिषद शाळेसाठी देणगीदारांच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या विविध गोष्टींचा उपयोग शालेय जीवनात विद्यार्थ्यांना होईल असे मत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब घुले यांनी व्यक्त केले.

काठापूर बुद्रुक (ता.आंबेगाव) या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित सत्कार सोहळ्याच्या निमित्त ते बोलत होते.

यावेळी सरपंच अशोक करंडे,मा. उपसरपंच विशाल करंडे,रोहिदास तुळे,अशोक जोरी, सोसायटीचे चेअरमन कुंडलिक जोरी, शाळेचे अध्यक्ष राहुल भुरके, काळुराम टिंगरे,शंकर करंडे, मंगेश करंडे, देवस्थानचे उपाध्यक्ष नरहरी करंडे, रामदास करंडे,राजु जोरी,संतोष करंडे,किशोर करंडे,दत्तात्रय करंडे,नवनाथ करंडे,हनुमंत रणपिसे, संदिप करंडे,मुख्याध्यापक नंदकुमार चासकर यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काठापूर बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी मागील चार वर्षांमध्ये शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामे करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या मदतीने ही सुधारणा करण्यात आली आहे. तसेच गावातील अनेकदा ग्रामस्थांनी वस्तूरुपी व भौतिक सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक देणगी दिली आहे. त्यामुळे अशा व्यक्तींचा सन्मान नुकताच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काठापूर बुद्रुक या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.देनगीदारांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आल्याचे अध्यक्ष राहूल भुरके यांनी सांगितले.

प्रास्ताविक सुरेश भागवत,सुत्रसंचालन नीलिमा वळसे, उत्तम वाव्हळ यांनी तर आभार दिनेश तूळे यांनी मानले.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.