आत्मा मालिक क्रीडा संकुलात राज्य क्रीडा दिवस संपन्न!!

आत्मा मालिक क्रीडा संकुलात राज्य क्रीडा दिवस संपन्न!!
शहापूर तालुक्यातील मोहिली-अघई येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित, आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल येथे परमपूज्य आत्मा मालिक माऊलींच्या कृपाशीर्वादाने संत भारत माता व संत परिवाराच्या प्रेरणेतून व संस्थेचे अध्यक्ष माननिय नंदकुमार सुर्यवंशी साहेब व समस्त विश्वस्त मंडळ व संकुलाचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त माननिय उमेश जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाने व क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित राज्य क्रीडा दिवसाचे व तालुकास्तरीय मिनी मॅरेथॉन व कुस्ती स्पर्धेचे आयोजन क्रीडा संकुलात उत्साहात संपन्न झाले.
या स्पर्धेला एकूण ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी कार्याध्यक्ष उमेश जाधव साहेब, स्थानिक शाखा सदस्य श्री.अनंतजी गायकवाड, श्री प्रवीण मोरे व्यवस्थापक श्री. उल्हास पाटील , आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य श्री पंकज बडगुजर सर, आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री कैलास थोरात सर, उपप्राचार्य सौ दिपाली खांडगे मॅडम, वसतिगृह विभागाचे व्यवस्थापक श्री बिकास रॉय आदी मान्यवर उपस्थित होते. स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विभाग प्रमुख श्री पुरुषोत्तम पानबुडे यांनी केले. अतिथी माननीय कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेश जाधव साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांना राज्य क्रीडा दिवसाच्या शुभेच्छा दिल्या . स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना अतिथींच्या हस्ते प्राविण्य प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता सामूहिक ध्यानाने करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा विभागातील सर्व क्रीडा शिक्षक यांनी अथक परिश्रम घेतले.