आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

शिरूर – आंबेगाव हे दोन्ही तालुके जोडणारा महत्वाचा रस्ताच हरवला खड्ड्यात!!

खड्ड्यात हरवले रस्ते!!आजचा रस्ता शिरूर - आंबेगाव तालुक्यांना जोडणारा शिंगवे - पिंपरखेड रस्ता!

 

खड्ड्यात हरवले रस्ते!!आजचा रस्ता शिरूर – आंबेगाव तालुक्यांना जोडणारा शिंगवे – पिंपरखेड रस्ता!

राजकीय,सामजिक,धार्मिक,शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे पुणे जिल्ह्यातील दोन महत्वाचे तालुके म्हणजे आंबेगाव, शिरूर तालुका.. नगदी पिकांची रेलचेल, दुग्ध व्यवसाय, उसाचे मुबलक क्षेत्र अशा सर्व बाजूंनी सक्षम असणारे हे दोन्ही तालुके जोडणारा एक महत्वाचा दुवा म्हणजे शिंगवे – पिंपरखेड रस्ता!!

पण हा रस्ताच सध्या खड्ड्यात हरवून गेला आहे. विशेषतः शिंगवे गाव ते शिंगवे फाटा, शिंगवे फाटा ते काठापूर खु. या मार्गावर असणारी खड्यांची संख्या जास्त आहे. या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी, वाहन चालक सर्वजण यामुळे त्रस्त झाले आहेत.

दोन महत्वाचे तालुके जोडणारा हा रस्ता कधी होणार दुरुस्त?

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.