समर्थ ज्युनिअर कॉलेज चा निकाल ९५.२६%

समर्थ ज्युनिअर कॉलेज चा निकाल ९५.२६%
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ज्युनिअर कॉलेज बांगरवाडी,बेल्हे या विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल लागला असल्याची माहिती प्राचार्या वैशाली आहेर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून समर्थ ज्युनिअर कॉलेज मधील विज्ञान शाखेतून चैताली खराडे या विद्यार्थिनीने ८४.८३% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला.तसेच साक्षी औटी हिने ७३.००% मिळवून द्वितीय क्रमांक व समिक्षा खराडे हिने ७०.५०% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
वाणिज्य (इंग्रजी माध्यम) शाखेतील रिद्धी डोंगरे ८२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
विनायक लामखडे ८१.३३% गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण तर सृष्टी साबळे ७९.६७% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. ज्ञानेश्वरी आहेर ८२.१७% गुण मिळवून वाणिज्य (मराठी माध्यम) शाखेत प्रथम क्रमांक,रविंद्र हिवराळे ७९.८३% गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर पलक आहेर ७० % गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
शाखेनुसार विचार करता विज्ञान शाखेचा निकाल ९४.५९% ,वाणिज्य(इंग्रजी माध्यम) शाखेचा ९५.६५% आणि वाणिज्य (मराठी माध्यम) शाखेचा निकाल ९६.९६% टक्के लागला आहे.
हया परीक्षेस समर्थ ज्युनिअर कॉलेज,बांगरवाडी मधील विज्ञान व वाणिज्य शाखेतील एकूण १९० विद्यार्थी परिक्षेला बसले होते व १८१ विद्यार्थी पास झाले असून कॉलेजचा निकाल ९५.२६% लागला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.