वडगावपीर(ता.आंबेगाव) येथे श्री पिरसाहेब यात्रा उत्सवाचे आयोजन!!

वडगावपीर(ता.आंबेगाव) येथे श्री पिरसाहेब यात्रा उत्सवाचे आयोजन!!
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या वडगावपीर (ता.आंबेगाव ) येथील श्री पिरसाहेब यात्रा उत्सवाचे मंगळवार दि.१४ मार्च २०२३ ते गुरुवार दि .१६ मार्च २०२३ असे तीन दिवस आयोजन केले आहे. मंगळवार (दिः१४) रोजी सांयकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत संदल हा कार्यक्रम होणार आहे. बुधवार (दि :१५) रोजी सकाळी आठ वाजता देवास शेरणी व दंडवते व सकाळी आठ ते सात वाजता बैलगाड्याच्या भव्य शर्यती होणार आहेत. बैलगाड्यांसाठी एकूण इनाम २,४८,८५१ रुपये असून, प्रथम क्रमाक-५५५५५/ रुपये, द्वित्तीय क्रमाक-४४४४४/ रुपये, तृत्तीय क्रमाक-३३३३३/ रुपये, चतूर्थ क्रमाक-२२२२२/ रुपये. तसेच फायनल साठी प्रथम क्रमांक-२१००१/ रुपये,द्वित्तीय क्रमाक-१५००१/ रुपये,तृतीय क्रमांक-११००१/ रुपये. तसेच घोड्यांच्या शर्यती साठी प्रथम क्रमाक-१५०१/ रुपये,द्वित्तीय क्रमाक-११०१/ रुपये,तृतीय क्रमांक-९०१/ रुपये.घाटाचा राजा १११११/ रुपये,वीस फूटावर कांडे-५५५५/ रुपये. तसेच पहिल्यात पहिला येणार्या गाड्यास -९००१/ रुपये, दुसर्यात पहिला येणार्या गाडयास-७००१/ रुपये, तिसर्यात पहिल्या येणार्या गाडयास-५००१/ रुपया, चौथ्यात पहिला येणार्या गाडयास-३००१/ रुपये. बैलगाड्यांच्या शर्यतीनंतर रात्री दहा वाजता कै. सजय महाजन यांचे आनंद लोकनाटय मंडळ जळगाव यांचा लोकनाटय तमाशाचा करमणूकीचा कार्यक्रम होईल. गुरुवार ( दिः१६) रोजी दुपारी तीन ते सात वाजेपर्यंत कुस्त्यांचा जंगी आखाडा होईल व रात्री दहा वाजता भिका-भिमा सांगवीकर यांचे चिरंजीव गणेश-राजेश सांगवीकर यांचा लोकनाटय तमाशाचा करमणूकीचा कार्यक्रम होईल.या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.या सर्व कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन समस्त ग्रामस्थ वडगावपीर-मांदळेवाडी,मुंबई,पुणे व शिवछत्रपती ग्रामविकास प्रतिष्ठान व सर्व मंडळे यांनी केले आहे.असे ग्रामस्थांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.