
मेंगडेवाडीत शिवजयंती उत्साहात साजरी!!
महिलांना महाराजांच्या महाआरतीचा मान!!
मेंगडेवाडी (ता.आंबेगाव) येथे स्वराज्य युवा प्रतिष्ठान व नवरात्र उत्सव मंडळ मेंगडेवाडी यांनी शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते यंदाचे ३१ वे वर्षे असून यावेळी छत्रपती शिवाजी महाजांना दुग्धाभिषेक करुण रात्री दहा वाजता शिवभक्तांनी किल्ले शिवनेरीकडे प्रस्थान केले रात्री एक वाजता शिवजन्म स्थळी शिवज्योतीचे प्रज्वलन करुण जय भवानी जय शिवाजी हर हर महादेवचा शिवगर्जाना करत संपूर्ण शिवनेरी गड शिवमय करुण आकाशाच्या दिशेने भगवे झेंडे फिरकावले.किल्ले शिवनेरी ते मेंगडेवाडी ठिकठिकाणी शिवज्योतीचे स्वागत झाले.
शुक्रवारी सकाळी सात वाजता मेंगडेवाडीमध्ये शिवज्योतीचे आगमन झाले तसेच महाजांच्या पुतळ्याचे व शिवज्योतीचे पुजन ग्रामस्थ महिलाव शिवभक्तांनी केले
सायंकाळी महाराजांची भव्य दिव्य मिरवणूक यावेळी काढण्यात आली होती.
मिरवणूकीसाठी महिलांनी नववारी साडी नेसून मराठमोळा साज परिधान करत पारंपरिक फुगड्या खेळल्या शेवटी सर्व महिलांच्या हस्ते महाराजांची महाआरती करुण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या कार्यक्रमास ग्रामस्थ तसेच महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.