कीड प्रतिबंध आणि उत्पादन वाढीसाठी बीज प्रक्रीया करावी!! – कृषी पर्यवेक्षक रोहन शेटे

कीड प्रतिबंध आणि उत्पादन वाढीसाठी बीज प्रक्रीया करावी!! – कृषी पर्यवेक्षक रोहन शेटे
प्रतिनिधी-समीर गोरडे
कृषी संजीवनी पंधरवडा मौजे- ठाकरवाडी येथे शेतकऱ्यांना रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.सोयाबीन बियाण्यास रासायनिक व जैविक बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच महाडीबीटी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना फळबाग,पी एम एफ एम ई योजनेबद्दल माहिती कृषी पर्यवेक्षक रोहन शेटे यांनी दिली.कृषी सहाय्यक उषा खैरे, अमोल खमसे, रेणुका तळपे उपस्थित होते.
सदर कृषी संजीवनी पंधरवडा मंडळ कृषी मंडल अधिकारी रामचंद्र बारवे व तालुका कृषी अधिकारी नरेंद्र वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
यावेळी मा. पं समिती सदस्य खंडु पारधी,उपसरपंच विजय बारवे,व्हाईस चेअरमन खंडु बारवे,गंगाराम केदारी मा.सरपंच बाळासाहेब जाधव, हनुमान बारवे, भास्कर बारवे सुभाष जाधव वामन खंडागळे ,संतोष जाधव,शरद पारधी, वसंत बारवे,देविदास पारधी, सागर जाधव,शंकर पारधी, नारायण बारवे, विलास बारवे, दिलीप हगवणे,गजानन जाधव, रामदास हगवणे, हरीभाऊ पारधी, योगेश पारधी,रोशन पारधी, रविंद्र जाधव रोहिदास काळे आदी शेतकरी उपस्थीत होते.
“बीज प्रक्रिया केल्यामुळे जमिनीतुन व बियाणाद्वारे पसरणाऱ्या रोगांचा आणि रोप अवस्थेत येणाऱ्या खोडमाशीचा प्रादुर्भाव टाळता येतो. बियाण्याची उगवण क्षमता वाढते. रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात. कमी खर्चात रोग प्रतिबंधात्मक उपाय करून पेरणी करता येते. पिकाच्या उत्पादनात वाढ होते,’’ असे कृषी पर्यवेक्षक रोहन शेटे यांंनी सांगितले.