भिमाशंकर महिला ग्रामसंघ व पुणे येथील हीलिंग हॅन्डस फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळगाव(खडकी) येथे नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर संपन्न!!

भिमाशंकर महिला ग्रामसंघ व पुणे येथील हीलिंग हॅन्डस फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळगाव(खडकी) येथे नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर संपन्न!!
जागरूकता ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली !!
आंबेगाव तालुक्यातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या भीमाशंकर महिला ग्रामसंघ व पुणे येथील हीलिंग हॅन्डस फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळगाव(खडकी) येथे नागरिकांसाठी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबीराचे उद्घाटन युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, मा.उपसरपंच वसंतराव राक्षे ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल बांगर, सौ.पुजाताई बांगर यांच्या प्रमुख उपस्थिती उत्साहात संपन्न झाले.
शिबीरात मूळव्याध, भगंदर, बद्धकोष्टता, हर्निया व व्हेरीकोज वेन्स आदी गंभीर आजारांविषयी नागरिकांना तज्ञांनी मार्गदर्शन करत मोफत औषधांचे वाटप केले. यावेळी दिवसभर सुरु असलेल्या शिबीरात डॉ.अश्विनी पारगेवार यांनी रुग्णांना प्राथमिक प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपायांचे निदान व स्पष्टीकरण दिले. तेजश्री खलाटे यांनी त्यांचे समुपदेशन केले. आनंद मिसाळ यांनी या मोहिमेला सक्रिय सहकार्य केले. सौ.अनिता सैद आणि मधुरा भाटे यांनी रुग्णांना विविध योजनांची माहिती सांगितली.
यावेळी शंभु महादेव सहकारी दूध संस्थेचे चेअरमन हनुमंत पोखरकर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनसू पोखरकर, आंबेगाव पंचायत समिती उम्मेद अभियानाचे लक्ष्मण ढोबळे. त्रिंबक पारासुर, सी.आर.पी.कविता पोखरकर, सौ.माधुरी बांगर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.