काठापूर बुद्रुक (ता आंबेगाव) येथील भोकरवाडी येथे तुका आकाशा एवढा… संगीतमय कथा संपन्न!!
काठापूर बुद्रुक (ता आंबेगाव) येथील भोकरवाडी येथे तुका आकाशा एवढा… संगीतमय कथा संपन्न!!
काठापूर बुद्रुक (ता आंबेगाव) येथील भोकरवाडी येथे तुका आकाशा एवढा या संगीतमय कथेचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले या वेळी ह.भ.प.संतोष महाराज बढेकर यांनी सादर केलेल्या कथेला मोठ्या प्रमाणावर परीसरातील नागरिकांनी उपस्थित राहत होते.
आंबेगाव तालुक्याचे पुर्व भागातील काठावर बुद्रुक येथील भोकरवाडी मध्ये दरवर्षी कथा सप्ताह आयोजन केले जाते. याही वर्षी तुका आकाशा एवढा या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावरील संगीत कथेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सप्ताहाला परीसरातील मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित राहत होते. यावेळी सात दिवस संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावरील विविध प्रसंग पात्ररूपाने दाखवण्यात आले.स्थानिक ग्रामस्थांनी विविध पात्रे सादर केली.यावेळी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ व आजूबाजूच्या गावातील लोक उपस्थित राहत होते. यावेळी सात दिवस अन्नदान करण्यात आले.
दरवर्षी गणेश मुर्ती स्थापनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्त सप्ताह आयोजित केला जातो. सात दिवस विविध प्रसंग दाखविण्यात आले.यावेळी मा. उपसरपंच विशाल करंडे, विठ्ठल करंडे, संतोष करंडे ,बाळासाहेब करंडे,लहु करंडे, सोमनाथ हिंगे,नवनाथ करंडे, रामदास करंडे ,अक्षय करंडे, अनिल करंडे,योगेश करंडे,फकीरा करंडे,अशोक करंडे, दत्तात्रय करंडे,एकनाथ करंडे,योगेश करंडे,कचर करंडे,महादु करंडे,माऊली करंडे,नंदहरी करंडे,अमोल करंडे, गणेश हिंगे यांसह ग्रामस्थांनी व्यवस्था पाहिली.
ह.भ.प.संतोष महाराज बढेकर यांनी सादर केलेल्या कथेचे सादरीकरण पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहत होते.