आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

सी.बी.एस.ई नॅशनल योगा चॅम्पियनशिप २०२३ राष्ट्रीय योगासन स्पर्धेत आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलचा संत सुनील मांजे पाचवा!!

सी.बी.एस.ई नॅशनल योगा चॅम्पियनशिप २०२३ राष्ट्रीय योगासन स्पर्धेत आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलचा संत सुनील मांजे पाचवा!!

गाजियाबाद उत्तर प्रदेश येथे सी.बी.एस.ई अंतर्गत राष्ट्रीय योगासन स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या. या योगा स्पर्धेत उत्तर प्रदेश येथील गाजियाबादच्या के.डी.बी. पब्लिक स्कूल याठिकाणी पार पडल्या. सदर स्पर्धा उत्तर प्रदेश येथील गाजियाबाद शहरातील के.डी.बी. पब्लिक स्कूल येथे संपन्न झाल्या या ठिकाणी देशभरातील तसेच विवीध राज्यातील केंद्रीय माध्यमिक शाळा सहभागी झाल्या होत्या.

सी.बी.एस.ई नॅशनल योगा चॅम्पियनशिप २०२३ राष्ट्रीय योगासन स्पर्धेत शहापूर तालुक्यातील आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलातील आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल मोहिली-अघई ता. शहापूर येथील आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलचा १४वर्ष वयोगटात पारंपारिक योगासन प्रकारात आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलचा संत सुनील मांजे या आत्मा मालिकच्या विद्यार्थ्यांचा योगासन स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर पाचवा क्रमांक पटकावला असून यात बारा उत्कृष्ट योग पटूंची संपूर्ण देशभरामधून निवड करण्यात आली. त्यात उत्कृष्ट योगपटू यादीत पाचव्या क्रमांकाचे स्थान मिळवत आत्मा मालिक च्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय स्तरावर भरारी घेतली. तसेच संत सुनील मांजे यांनी विविध योग प्रकारात सूर्यनमस्कार,योगासने सादर करीत उपस्थितांची दाद घेतली. याबाबत आत्मा मालिकांच्या विद्यार्थ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेश जाधव साहेब, यांनी विद्यार्थ्याने मिळवलेल्या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन शुभेच्छा दिल्या.तसेच स्थानिक व्यवस्थापन समिती शाखा-शहापूर.सहाय्यक शैक्षणिक व्यवस्थापक डी.डी. शिंदे , व्यवस्थापक गुलाब हिरे ,आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य आशिष काटे व उपप्राचार्य जालिंदर हासे सर, योग प्रशिक्षक पुरुषोत्तम पानबुडे यांनी अथक परिश्रम घेतले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.