उत्कर्ष गणेश मंडळाने जपली परंपरा!! महिलांची हस्ते संपन्न झाली गणपती बाप्पाची महाआरती !!
उत्कर्ष गणेश मंडळाने जपली परंपरा!! महिलांची हस्ते संपन्न झाली गणपती बाप्पाची महाआरती !!
आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या पारगाव (शिंगवे) येथील उत्कर्ष गणेश मंडळाने 41 वर्षाची परंपरा जपली आहे. गणेश उत्सव काळात उत्सवाच्या दरम्यान दरवर्षी महिलांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती संपन्न होत असते. उत्कर्ष गणेश मंडळाने याही वर्षी ही परंपरा जपली आहे.पारगाव (शिंगवे) गावातील उत्कर्ष गणेश मंडळ नोंदणीकृत मंडळ आहे.या वर्षी मंडळ ४१व्या वर्षात यंदा पदार्पण करत आहे.
गावातील सर्वांनी एकत्र येऊन उत्कर्ष गणेश मंडळाची स्थापना केली.या मंडळामध्ये सर्वच जाती,धर्माचे,पंथाचे लोक त्याचप्रमाणे बारा बलुतेदार एकत्रितपणे दरवर्षी श्री गणेशाची मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने पूजा अर्चा करतात.दरवर्षी सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक,नैसर्गिक,राजकीय,उपदेशपर,लोककलेवर आधारित,पारंपरिक,लोकजागृतीपर विषयावर आधारित असे नवनवीन देखावे हे मंडळ साकारण्याचा प्रयत्न करत असते.महिल्यांच्या हस्ते महाआरती,होम मिनिस्टर ,संगित कार्यक्रम,भव्य डान्स स्पर्धा असे अनेक कार्यक्रम होत असतात. दरवर्षी येथील भाविक या गणेशाला इप्सित कार्य पार पडण्यासाठी नवस करतात व हा गणेश नवसाला पावतो.मनात भाव शुद्ध असेल तर गणपती शुभ फळ देतो अशी याची ख्याती आहे.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रांगोळी स्पर्धा,संगीत खुर्ची,दांडिया,चमचा लिंबू इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.मंडळाच्या या यशस्वी वाटचालीत तरुण वर्गाचा सक्रिय सहभाग व मोलाचा वाटा आहे.