आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्यातील काठापूरमध्ये आभाळ फाटलं,तीन तास ढगफुटीसदृश्य पाऊस, उभी पिके भुईसपाट!!

आंबेगाव तालुक्यातील काठापूरमध्ये आभाळ फाटलं,तीन तास ढगफुटीसदृश्य पाऊस, उभी पिके भुईसपाट!!

आंबेगाव तालुक्यात आज पावसाने जोरदार हजेरी लावली. आंबेगाव तालुक्यातील काठापूर गाव आणि परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे ओढ्यांना पूर आला तसेच शेती पिकांचे, शेतीच्या बांधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गेल्या आठ ते दहा वर्षातील सगळ्यात मोठा पाऊस काठापूर मध्ये बरसल्याने आनंद व्यक्त करावा की शेतीच्या नुकसानामुळं चिंता व्यक्त करावी, अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरू झालेला पाऊस तब्बल सायंकाळी साडेसहा पर्यंत सुरू होता. मुसळधार पावसाने शेतातील उभी पिके भुईसपाट केली असून अनेक शेतीचे बांध फुटले आहेत. त्यामुळे येथील शेतीचे नुकसान झाले आहे.पावसाळा सुरू झाल्यापासून पाऊस हुलकावणी देत होता. सर्वत्र पावसाने हुलकावणी दिल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, आज दुपारी साडेतीन वाजता विजांच्या कडकडाटासह काठापूर बुद्रुक व परिसरात चांगल्या स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामध्ये काठापूर बुद्रुक मध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने ओढेनाले तुडुंब भरून वाहत होते. अनेक शेतांमध्ये तळ्याचे स्वरूप आल्याचे पाहावयास मिळाले.मागील वर्षातील सगळ्यात मोठा पाऊस काठापूर मध्ये झाला झाल्याचे माजी उपसरपंच विशाल करंडे यांनी सांगितले. पावसाळा सुरू झाल्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. शेतकरी वर्ग पावसाच्या आगमनाने समाधानी आहे. परंतु, शेती पिकांचे झालेले नुकसान तसेच शेतीचे झालेले नुकसान हे मात्र मोठ्या प्रमाणावर झाले आहे. सायंकाळी साडेसहाला पाऊस उघडल्यानंतर नुकसान शेतकऱ्यांच्या लक्षात आले. अनेक लहान उगवलेल्या पिकांनाही मोठा तडाखा बसला आहे. एकंदरीतच हा झालेला पाऊस दिलासा देणारा असला तरीही पिकांचे झालेली नुकसानामुळे शेतकरी चिंतेतच आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.