आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

इजिमा २४ तुकानाना चौक – पिंपळगाव(खडकी) ते अवसरी बुद्रुक रस्त्याचा समावेश प्रमुख जिल्हा मार्गात(प्रजिमा) करण्याची मागणी !!

इजिमा २४ तुकानाना चौक – पिंपळगाव(खडकी) ते अवसरी बुद्रुक रस्त्याचा समावेश प्रमुख जिल्हा मार्गात(प्रजिमा) करण्याची मागणी !!

मौजे पिंपळगाव तर्फे महाळूंगे येथील ईजिमा २४- तुकानाना चौक, चांडोली फाटा ते पिंपळगाव(खडकी) आणि पिंपळगाव(खडकी) ते टाव्हरे वाडी मार्गे अवसरी बुद्रुक हा रस्ता आंबेगाव तालुक्यातील सर्वात चर्चेचा रस्ता मानला जातो.

प्रत्येक पावसाळ्यात ह्या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे ठरलेले असतात. ह्या रस्त्यावर दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे ह्या रस्त्याची दर्जोंन्नती व्हावी ही पिंपळगाव(खडकी), चांडोली खुर्द, टाव्हरेवाडी, अवसरी बुद्रुक, निरगुडसर यांसह आंबेगाव तालुक्यातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.चंद्रकांत दादा पाटील यांनी मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या मागणीनुसार जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ह्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ७० लक्ष रुपयांची तरतुद देखील केली आहे. रस्त्याची एकूण लांबी पाहता हा निधी देखील कमी पडणार आहे.

ह्या रस्त्याची दर्जोंन्नती होऊन ह्या रस्त्याचे प्रमुख जिल्हा मार्गात (प्रजिमा) रूपांतर व्हावे व रस्त्यासाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्यात यावी यासाठी शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर यांनी सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता मा.आर.वाय.पाटील साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन प्रस्ताव सादर केला.

मा.कार्यकारी अभियंता सो यांनी देखील ह्या रस्त्याचा समावेश प्रमुख जिल्हा मार्गात (प्रजिमा) समावेश करणार असल्याची याप्रसंगी ग्वाही दिली. यावेळी शिवाजी दादांचे स्विय सहाय्यक ज्ञानेश्वर काजळे, युवासेना जिल्हाप्रमुख प्रविण थोरात पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.