आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवारीमळा(मेंगडेवाडी)शाळेत आजी आजोबा दिवस उत्साहात संपन्न!!

आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवारीमळा(मेंगडेवाडी )शाळेत आजी आजोबा दिवस उत्साहात संपन्न!!
आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवारीमळा(मेंगडेवाडी )शाळेत आजी आजोबा दिवस उत्साहात व प्रसन्नमय वातावरणात पार पडला.आजी आजोबांचे स्थान प्रत्येक मुलांच्या जीवनात अतिशय महत्त्वाचे असते.प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या नातवाला आई-वडिलांपेक्षा जास्त जीव लावणारे आजी आजोबा सर्वांसाठी प्रिय असतात. त्यांचे हे मोलाचे स्थान लक्षात घेऊन त्यांच्या आदरासाठी शाळेत आज आजी आजोबा दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सीमा काळे मॅडम यांनी केले. त्यानंतर सर्व आजी-आजोबांचे त्यांच्या नातवांकडून औक्षण करण्यात आले. सर्व मुलांनी आपल्या आजी आजोबा यांची पूजा केली तसेच त्यांचे दर्शन घेतले. त्यानंतर आजी आजोबांचा उखाण्याचा कार्यक्रम पार पडला.तसेच उखाण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर संगीत खुर्चीचेही आयोजन करण्यात आले होते .त्यामध्ये सर्व आजींनी खूप उत्साहाने सहभाग घेतला व जिंकलेल्या आजींना तसेच स्पर्धेत जिंकलेल्या शाळेतील मुलांचा सत्कार व कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष महेंद्र गवारी व शाळेतील उपशिक्षक राहुल पाटील सर यांनी मोलाची भूमिका पार पाडली. या कार्यक्रमासाठी विठ्ठल गवारी, शिलाबाई गवारी, नामदेव गवारी, वत्सला गवारी, चंद्रभागा गवारी, लताबाई गवारी,भागुजी गवारी, कौशाबाई गवारी, इंदुबाई गवारी, मंदा गवारी, सिंधुताई मेंगडे, सुरेखा गवारी,सोपान गवारी,सुलाबाई गवारी, मुक्ताजी गवारी, शांताराम गवारी,ज्ञानेश्वर गवारी, भाऊसाहेब मेंगडे, किर्ती गवारी, सुनिता गवारी हे सर्वजण तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.