आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

लोणी-निरगुडसर रस्त्यावर सिमेंट गोणी घेऊन जाणारा ट्रक पलटी!!

एकाच आठवड्यात घडली दुसरी घटना!!

लोणी निरगुडसर रस्त्यावर सिमेंट गोणी घेऊन जाणारा ट्रक पलटी!!

लोणी ते मंचर (ता.आंबेगाव ) रस्त्यावर निरगुडसर फाटा नजदिक हांडेवस्ती जवळ एमएच -१२, ई एफ- २२५७ हा सिमेंट ट्रक दिनांक २६ रोजी सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास मंचर कडून लोणी कडे जात असताना पलटी झाला असल्याची घटना घडली आहे. या अपघातात ट्रक ड्रायव्हर व इतर दोनजण जखमी झाले आहेत.

लोणी ते मंचर रस्त्यावर निरगुडसर फाटा व हांडे वस्ती नजदिक रस्त्याचे सिमेंटकॉक्रिटचे काम चालू आहे.निरगुडसर फाटा नजदिक काम पूर्ण झाले आहे.पण हांडे वस्तीजवळ रस्त्याचे सिमेंट कॉक्रिटचे काम संथ गतीने चालू आहे.शिवाय एकाच बाजूचा रस्ता पूर्ण झाल्याने मोठ्या वाहनांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.त्यामुळे या रस्त्यावर सध्यातरी वाहतूकीची मोठी समस्या आहे. या रस्त्यावर दिनांक २६ रोजी एक सिमेंट मिक्सर टँकर पलटी झाला होता. तसेच दिनांक २७ रोजी रात्री एक चार चाकी वाहनही रस्त्याच्या बाजूला साईड पट्ट्या व्यवस्थित भरल्या नसल्याने खाली गेली होती. त्यावेळेस स्थानिक तरुणांनी ती चार चाकी गाडी उचलून व्यवस्थित रस्त्यावर आणली. त्यानंतर आज दिनांक २८ रोजी पुन्हा सकाळी मंचर वरून सिमेंट गोणी भरून लोणी या ठिकाणी चाललेल्या ट्रक पलटी झाला आहे. या अपघातात ट्रकचालक सुखदेव भेके वय ५२, संदिप इंदोरे वय ३८, गणपत पारधी ( सर्व रा. मंचर ता.आंबेगाव ) हे जखमी झाले आहेत. लोणी,पाबळ वरून मंचरला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने लहान मोठ्या वाहनाची मोठी वर्दळ असते.तरी सार्वजानिक बांधकाम विभाग व सबंधित ठेकेदार याने रस्त्याचे उर्वरीत काम त्वरीत चालू करावे, रस्त्याच्या साईटच्या साईट पट्ट्या व्यवस्थित भरून घ्याव्यात अशी मागणी पोलीस पाटील विठ्ठल वळसे, स्थानीक नागरीक मा. तंटामुक्ती अध्यक्ष युवराज हांडे, सोसायटीचे मा.अध्यक्ष सुरेश आवारी, धनेश टाव्हरे, महादेव गवारी, यासह ग्रामस्थ व वाहन चालकांनी केली आहे. दरम्यान रस्त्याची दुरुस्ती लवकर न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.