मेंगडेवाडी (ता.आंबेगाव) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर पुष्पवृष्टी !!


पंचनामा निरगुडसर प्रतिनिधी – मेंगडेवाडी (ता.आंबेगाव) या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मेंगडेवाडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर शिवभक्त व ग्रामस्थांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून नारळ फोडून जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव असा जयघोष करण्यात आला यावेळी शिवव्याख्याते पोपटराव मेंगडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन प्रवास सांगून महाराजांचे विचार आज एकविसाव्या शतकाला किती मार्गदर्शक आहेत हे सांगितले यावेळी सरपंच बाळासाहेब मेंगडे, सुनील गवारी, दिलीप रणपिसे, दशरथ मेंगडे, आनंदराव मेंगडे, दत्तात्रय मेंगडे, नितीन मेंगडे पाटील, विठ्ठल गवारी, विठ्ठल मेंगडे, मधुकर मेगडे गुरुजी, दत्तात्रय मेंगडे, संतोष जाधव, सागर रणपिसे, संजय मेंगडे, साईनाथ मेंगडे, रामदास मेंगडे, ओमकार कदम आदी शिवभक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
