सामाजिक

केंद्रीय संचार ब्यूरोच्या आषाढी वारी विशेष चित्ररथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन !!

1010139883

पंचनामा प्रतिनिधी – केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, प्रादेशिक कार्यालय, पुणे यांच्या वतीने आषाढी वारी सोहळ्यानिमित्त जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष चित्ररथाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.

1010139897

यावेळी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक तथा सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पीएमपीएमएलचे संचालक अजय खेडेकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना, सामाजिक संदेश तसेच जनजागृतीपर माहिती वारकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने हा विशेष चित्ररथ तयार करण्यात आला आहे. वारी मार्गावर हा चित्ररथ विविध ठिकाणी जनजागृतीचे कार्य करणार असून, माहितीपर प्रदर्शन, ध्वनी प्रसारण आणि लोककलांच्या माध्यमांतून नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे.

1009850407

Related posts

आळंदीत मुक्तादेवी धर्मशाळेत मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना झाली संपन्न !!

Chief Editor

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते,समाज भूषण कैलासराव गायकवाड यांना आंबेगाव भूषण पुरस्कार प्रदान !!

Chief Editor

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान !!

Chief Editor

Leave a Comment