सामाजिक

ई – रिक्षा हॅक करून चालकांकडून खंडणी; ब्ल्यूटूथद्वारे रिक्षा बंद पाडून पैशाची मागणी !!

1010066718

पंचनामा प्रतिनिधी – डिजिटल तंत्रज्ञानामुळे सुविधा वाढल्या असल्या तरी सायबर गुन्हेगारही दिवसेंदिवस अधिक हुशार आणि धोकादायक पद्धती वापरत आहेत. आता ई-रिक्षा चालकांना लक्ष्य करणारा एक नवीन सायबर स्कॅम समोर आला आहे. आधुनिक ई-रिक्षांमध्ये असलेल्या स्मार्ट ब्लूटूथ कंट्रोलरचा गैरफायदा घेत काही भामटे रिक्षेच्या जवळ येऊन किंवा अनधिकृत ब्लूटूथ ॲप्स आणि हॅकिंग टूल्सच्या मदतीने रिक्षेचे नियंत्रण मिळवतात. त्यानंतर चालू रिक्षा अचानक बंद पडते आणि चालक अडचणीत सापडतो.

यानंतर चालकाला फोन किंवा डिजिटल माध्यमातून संपर्क करून “तुमची रिक्षा हॅक केली आहे, ती पुन्हा सुरू करायची असेल तर Google Pay किंवा PhonePe द्वारे ५०० ते २,००० रुपये पाठवा,” अशी मागणी केली जाते. अनेक गरीब आणि मेहनती ई-रिक्षा चालक भीतीपोटी किंवा पर्याय नसल्यामुळे पैसे भरतात. हा प्रकार केवळ आर्थिक फसवणूक नसून सार्वजनिक सुरक्षेलाही गंभीर धोका निर्माण करणारा आहे.

तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी ई-रिक्षा चालक असाल तर ही माहिती नक्की शेअर करा. अशा संशयास्पद घटना घडल्यास तात्काळ संबंधित कंपनी, स्थानिक पोलीस आणि सायबर क्राइम हेल्पलाइनकडे तक्रार करा. जागरूक राहा, सुरक्षित राहा आणि इतरांनाही सतर्क करा.

1009850407

Related posts

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागाला अवकाळीचा तडाखा; नगदी पिकांचे व पशुधनाचे प्रचंड नुकसान !!

Chief Editor

आयुष्याचा झोपाळा जितक्या वेगात मागे जातो तितक्याच वेगात तो पुढे पण येतो; फक्त संयम हवा..”

Chief Editor

जारकरवाडीच्या तरुणांनी जपली आषाढी बारशीच्या अन्नप्रसादाची अनोखी परंपरा !!

Chief Editor

Leave a Comment