माळशिरस तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत रक्षिता, सरिस्का,स्नेहल यांचे यश!!

माळशिरस तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत रक्षिता सरिस्का स्नेहल यांचे यश!!
अकलूज – शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज या ठिकाणी झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत रक्षिता जाधव, सरिस्का बावळे, स्नेहल श्रीखंडे ,श्रवण बोराटे ,यशराज कोरडकर ,अभिषेक पवार हे विजयी झाले आहेत.
दिनांक 25 व 26 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बागडे यांनी विद्यार्थी दशेतील खेळाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
14 वर्षे वयोगटात रक्षिता जाधव, मनस्वी राजपुरोहित, समृद्धी बाबर, पायल बिचुकले, सृष्टी हंगे तर 17 वर्षे वयोगटात सरिस्का बावळे, गौरी माने देशमुख, बोराटे उन्नती, भंडारे काळे, पायल आणि 19 वर्षे वयोगटात स्नेहल श्रीखंडे, शितल गेजगे, नेहा झेंडे, सानिका बिचकुले यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली.
तर मुलांच्या गटात श्रवण बोराटे, रेहान आतार, सार्थक भांगे, सम्राट घाडगे, सोमेश्वर माने सतरा वर्षे वयोगटात यशराज कोरडकर, पार्थ सावंत, मोहित जगताप, शुभम गाडे, अनमोल वाघमारे आणि 19 वर्षे वयोगटात अभिषेक पवार, गणेश अकोलकर, प्रतीक मस्के, प्रथमेश वाघमोडे, यशराज जगताप यांची निवड झाली. यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष मा. श्री. संग्रामसिंह मोहिते पाटील, सचिव श्री. अभिजीत रणवरे, सहसचिव – हर्षवर्धन खराडे यांनी अभिनंदन केले. स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून श्री.अभिजित बावळे यांनी काम पाहिले. तर स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी क्रीडा शिक्षक बाळासाहेब भोसले, महादेव आठवले, अली शेख , कर्णक्षी जाधव यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जाधव सर यांनी केले.