जवळे (ता.आंबेगाव) ग्रामपंचायतच्या माध्यमातून संपन्न झाली लकी ड्रॉ सोडत!!

जवळे (ता.आंबेगाव) ग्रामपंचायतच्या माध्यमातून संपन्न झाली लकी ड्रॉ सोडत!!
आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जवळे गावात ग्रामपंचायत जवळे यांच्या वतीने भव्य लकी ड्रॉ सोडत 16 मार्च रोजी करण्यात आली.ज्या ग्रामस्थांनी/ खातेदारांनी आपली घरपट्टी ग्रामपंचायतकडे भरणा केलेली आहे या सर्वांच्या नावाच्या चिठ्ठ्या एका बॉक्समध्ये टाकून शेवटच्या बक्षिसाकडून लकी ड्रॉ ची सुरुवात करण्यात आली.
यामध्ये एकूण 51 बक्षिसांचे वितरण करण्यात आले यावेळी भाग्यवान विजेते १)प्रथम क्रमांक सुभाष रंगुजी वाळुंज (सोन्याची अंगठी),२) द्वितीय क्रमांक नीता संतोष तराळ (एल सी डी टीव्ही),३) तृतीय क्रमांक बबनराव मारुती बोराटे (कपाट), ४) चतुर्थ क्रमांक देवराम कोंडीबा गावडे (वॉटर फिल्टर),५) पाचवा क्रमांक बबनराव नामदेव लोखंडे (ड्रेसिंग टेबल),६) सहावा क्रमांक कांताबाई रामदास मोरडे ( बॅटरी पंप) असे एकूण ५१ विजेते भाग्यवान ठरलेले आहेत या कार्यक्रमा वेळी जवळे गावच्या आदर्श सरपंच सौ.वृषाली उत्तम शिंदे पाटील, सौ.मनीषा टाव्हरे (उपसरपंच) चंद्रकला गायकवाड, प्रमिला गावडे ,संगीता साबळे सर्व सदस्य तसेच कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ,महिला भगिनी उपस्थित होते.
यावेळी घरपट्टी भरणे मध्ये सर्वसामान्य जनतेने भरभरून साथ दिली या सर्वांचं ग्रामपंचायत जवळे च्या वतीने हार्दिक आभार मानले.तसेच या लकी ड्रॉ साठी बक्षीस देणारे सर्व बक्षीसदात्यांचे सरपंच यांनी आभार मानले व राहिलेल्या सर्व ग्रामपंचायत खातेदारांनी 31 मार्च पूर्वी आपली घरपट्टी भरून ग्रामपंचायतला सहकार्य असावे अशी अपेक्षा केली.
कार्यक्रमाचे वेळी प्रत्येक खातेदाराला ओला कचरा व सुका कचरा असे दोन डस्टबिन ग्रामपंचायत च्या वतीने देण्यात आले सूत्रसंचलन शीला साबळे यांनी केले.असा लकी ड्रॉ कार्यक्रम ग्रामपंचायत जवळे या ठिकाणी 50 वर्षात प्रथमच करण्यात आलेला आहे यामुळे ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरती आनंद होता.