निगडाळे (ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक साक्षरता दिन उत्साहात साजरा !!


पंचनामा भीमाशंकर प्रतिनिधी – निगडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक साक्षरता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेत साक्षरता शपथ,गीतगायन,वाचन उपक्रम,घोषवाक्य लेखन स्पर्धा आदी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

साक्षरता सप्ताह निमित्त कार्यक्रमाच्या प्रारंभी अंगणवाडी मदतनीस लिलाबाई लोहकरे आणि शालेय विद्यार्थ्यांनी अंकाचे सुमधुर गीतगायन केले.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा इंद्रजित जाधव,शालेय व्यवस्थापन समिती सदस्या योगिता भोमाळे,पालक अनिता शेळके,माजी विद्यार्थी तनुजा भोमाळे,शिक्षक संतोष थोरात व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी शाळेत वाचनतास उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील कथापुस्तके व शालेय पाठ्यपुस्तकांचे सामूहिक वाचन केले.

यावेळी मुख्याध्यापिका शोभा जाधव यांनी मार्गदर्शनपर भाषणात साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले आणि विद्यार्थ्यांनी समाजातील निरक्षरता कमी करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.

शालेय विद्यार्थी व नागरिकांना साक्षरतेचे महत्त्व समजावे याकरिता शाळेत विद्यार्थ्यांकरीता घोषवाक्य लेखन स्पर्धा घेण्यात आली.विद्यार्थ्यांनी आपल्या मनाच्या कल्पनेने सुंदर घोषवाक्यांचे लेखन केले.कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी साक्षरता शपथ घेतली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन शिक्षक संतोष थोरात यांनी केले.