राजकुमार कांबळे यांना एलियर इव्हेंजेलिकल युनिव्हर्सिटीचा डॉक्टरेट सन्मान !!


राजकुमार कांबळे यांना एलियर इव्हेंजेलिकल युनिव्हर्सिटीचा डॉक्टरेट सन्मान !!
कोल्हापूर पंचनामा प्रतिनिधी – सामाजिक, शैक्षणिक व जनजागृती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राजकुमार कांबळे यांना एलियर इव्हेंजेलिकल युनिव्हर्सिटी (Elier Evangelical University) या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने डॉक्टरेट सन्मान प्रदान करण्यात आला.
हा गौरव सोहळा कोल्हापुरातील रेडियंट हॉटेल येथे पार पडला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते दैनिक रोखठोकचे कार्यकारी संपादक आणि इंडियन पोलीस मित्र भारतचे मुख्य अधिकारी डॉ. सुरेश राठोड तसेच या प्रसंगी सहाय्यक समादेशक सदानंद सदाशिव, डीआयडी फाउंडेशनचे डॉ. मॅडी तामगावकर, व आर.एस.पी. अधिकारी अभिजीत विभुते हे मान्यवर उपस्थित होते.
राजकुमार कांबळे यांचे कार्य विविध क्षेत्रांतील समाजहितासाठी सातत्याने सुरू असून, त्यांना मिळालेला डॉक्टरेट सन्मान हा त्यांच्या कार्याची अधिकृत पावती मानली जात आहे.कार्यक्रम उत्साही वातावरणात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडला.
