शिवसेना युवानेते मा.अक्षयदादा शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर तालुका संवाद दौरा प्रसंगी रांजणगाव गणपती गावाला दिली भेट!!

शिवसेना शिरूर तालुका संवाद दौरा !!
शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवानेते मा.अक्षयदादा शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर तालुका संवाद दौरा प्रसंगी रांजणगाव गणपती गावाला भेट दिली. भेटीप्रसंगी त्यांनी उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करुन रांजणगाव गणपती गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक बळ देणार असल्याचे सांगितले.
यावेळी युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, युवासेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर पाटील, नवनिर्वाचित शिवसेना शिरूर-आंबेगाव तालुकाप्रमुख मल्हारीशेठ काळे, युवासेना पुणे जिल्हा सरचिटणीस वैभव ढोकले, युवासेना संघटक वैभव खेडकर, मा.ग्रामपंचायत सदस्य संदीप कुटे पाटील, मा.उपसरपंच श्रीरंग शेलार, उद्योग आघाडी जिल्हाप्रमुख अभिजित बत्ते, युवासेना समन्वयक गोवर्धन पाचंगे, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख संग्राम शिंदे, संदीप गव्हाणे, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक योगेश बाणखेले, उत्तमराव गव्हाणे, अंकुश शेवाळे, अक्षय खेडकर, युवासेना समन्वयक आकाश मोरडे, सोशल मीडिया तालुकाप्रमुख मोहन घोलप यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.