आरोग्य व शिक्षणसामाजिक

आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे अध्यक्ष, खडकवाडी गावचे मा. उपसरपंच श्री. किरणशेठ वाळूंज पाटील यांना धामणी गावचे मा.सरपंच सागर जाधव पाटील व सामाजिक कार्यकर्ते श्री.ज्ञानेश्वर उर्फ माऊली क्षिरसागर यांनी अभिनव पद्धतीने दिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे अध्यक्ष, खडकवाडी गावचे मा. उपसरपंच श्री. किरणशेठ वाळूंज पाटील यांना धामणी गावचे मा.सरपंच सागर जाधव पाटील व सामाजिक कार्यकर्ते श्री.ज्ञानेश्वर उर्फ माऊली क्षिरसागर यांनी अभिनव पद्धतीने दिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

२७ मार्च वाढदिवस आहे लाडक्या मित्राचा!!

आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे अध्यक्ष, खडकवाडी गावचे मा. उपसरपंच श्री. किरणशेठ वाळुंज पाटिल!!

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील खडकवाडी गावातील सर्वसामान्य शेतकरी, माळकरी कुटुंबात किरण वाळूंज यांचा जन्म झाला…घरामध्ये आधीपासून वारकरी संप्रदायाची परंपरा घरातील प्रत्येकाच्या गळ्यात तुळशीची माळ पंढरपूरच्या पांडुरंगाचे, आळंदीच्या ज्ञानोबांचे,देहुच्या तुकोबांचे आणि खडकवाडी गावचे ग्रामदैवत नाथसाहेबांचे निस्सीम भक्त अशी वाळुंज पाटिल घराण्याची परंपरा!! त्यामुळे समाजात किरण यांच्या घराला मानाचे स्थान राहिले आहे.

सर्वसामान्य कुटुंबात जन्म झाल्यानंतर किरण ते किरणशेठ हा प्रवास खूप मोठा आहे. शाळा सुटल्यानंतर छोटा,मोठा व्यवसाय केला. ट्रॅक्टर व्यवसाय, किराणा दुकान, दुध डेअरी, हॉटेल व्यवसाय, तरकारी गाडीवरती ड्रायव्हर इतर अनेक कामे केली. कधी यश यायचे कधी अपयश यायचे!! परंतु खचुन न जाता पुन्हा नव्याने नविन व्यवसायात उडी घ्यायची. ही कामे करत असताना लोकांमध्ये राहुन तळागाळातल्या लोकांच्या समस्या सोडवत राहणे हा उपजत गुण किरणशेठ च्या अंगात होता.

आधीपासून हिंदुत्वाचे विचार आणि सरपंच अनिलशेठ डोके यांचा जवळचा विश्वासू कार्यकर्ता म्हणून किरण शेठ ची ओळख परिसरामधे आहे…

खडकवाडी ग्रामपंचायत मध्ये दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून भरघोस मताने किरणशेठ निवडून गेले.एकदा उपसरपंच म्हणून काम करायची संधी सुद्धा मिळाली. आणि त्या संधीचं सोनं करत असताना सर्वसामान्यांची कामे करायचा प्रयत्न नेहमी केला.दरम्यानच्या काळात किरणशेठ यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्यावेळेस कामाला सुरुवात केली, त्यावेळेस खऱ्या अर्थाने खडकवाडी असेल आजूबाजूची गाव असेल,यामध्ये विकास कामांना निधी देत असताना नेहमी पक्षाकडून विकासकामांना निधी आणण्याचे काम किरणशेठने केले.

भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत असताना सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यायचे काम करत आहे. विशेषतः संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना,अंध अपंग बांधवांना विविध योजनांचा लाभ देणे, आयुष्मान कार्ड, वयोश्री योजना त्याचप्रमाणे रेशनिंग कार्डची कामे किंवा महसूल विभागासंदर्भात कामे असतील, पोलीस स्टेशन मधील कामे असतील हे काम करण्यामध्ये किरण शेठ नेहमी अग्रेसर राहिलेले आहेतच.त्याचप्रमाणे प्रशासनातला दांडगा अभ्यास अधिकाऱ्यांशी असणारे सलोख्याचे संबंध ही त्यांची जमेची बाजु आहे.

किरणशेठ यांच्या कामाची पावती म्हणुन भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींनी आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या कामगार आघाडीचे अध्यक्ष म्हणून किरण शेठ यांची निवड केली. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये किरणशेठ ने आंबेगाव तालुक्यामध्ये केलेले काम हे खूप मोठे आहे. या कामांमुळेच आज किरणशेठ यांची समाजामध्ये एक चांगली ओळख निर्माण झाली आहे.

सर्वसामान्यांमध्ये असणारा दांडगा संपर्क, सर्वांशी आदबीने बोलणे, कुठलेही काम असो किंवा कुठलीही समस्या असो जर किरणशेठकडे गेल्यानंतर ती समस्या नक्कीच दूर होते.अशी सर्वसामान्यांची धारणा होऊन बसलेली आहे.

आजही लोणी येथे असणाऱ्या त्यांच्या ऑफिसला दिवसातून अनेक वृद्ध, ज्येष्ठ, तरुण,विद्यार्थी, गोरगरीब, कष्टकरी बांधव आपापल्या समस्या त्या ठिकाणी घेऊन येत असतात. किरणशेठ सुद्धा समस्या सोडवायचं काम त्या ठिकाणी करत असतात. भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी केलेले चांगलं काम हे पक्ष नेतृत्व नक्कीच भविष्यात त्याची दखल घेईल अशी खात्री आहे.

आज किरणशेठ यांचा वाढदिवस आहे. मी किरणशेठ यांचा जवळचा मित्र आहे याचा मला नेहमी सार्थ अभिमान आहे!!!मी त्यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा देतो.त्यांना उदंड आयुष्य लाभो ही कुलस्वामी कुलदैवत म्हाळसाकांत खंडोबा चरणी प्रार्थना करतो.

आकाशाला अशी गवसणी घाला कीपक्ष्यांना प्रश्न पडावा,ज्ञान असे मिळवा की,सागर अचंबित व्हावा..इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा..
कर्तुत्वच्या अग्निबाणाने,धेय्याचे गगन भेदून,यशाचा लक्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल!!हीच आपणास वाढदिवसानिमित्त मनस्वी शुभकामना!!

शुभेच्छुक- श्री.ज्ञानेश्वर उर्फ माऊली क्षिरसागर (समाजिक कार्यकर्ता लोणी)

श्री.सागर सुनिलदादा जाधव पाटिल
( प्रथम लोकनियुक्त सरपंच धामणी)

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.