वडगावपीर(ता.आंबेगाव) येथे श्री पीरसाहेब महाराज यात्रेची भव्य निकाली कुस्त्यांनी सांगता!!

वडगावपीर(ता.आंबेगाव) येथे श्री पीरसाहेब महाराज यात्रेची भव्य निकाली कुस्त्यांनी सांगता!!
वडगावपीर (ता.आंबेगाव ) येथे श्री पीरसाहेब यात्रा उत्सवा निमित्त समस्त ग्रामस्थ वडगावपीर व मांदळेवाडी व कै.विठ्ठल किसन राजगुडे यांचे प्रथम पुण्यस्मरणार्थ पुणे,अहिल्यानगर,सातारा,सांगली व अन्य जिल्ह्यातुन आलेल्या मल्लांच्या नऊ मानाच्या निकाली कुस्त्यांनी “ विठ्ठल मैदानावर ” कुस्तीप्रेमींचे मने जिंकली व कुस्ती शौकिनाची वावा मिळवली.
यावेळी विजय तातुराव राणे,देवदत्त निकम,अरुण गिरे,अभिजीत खाणविलकर,संतोष कचरे,अभिषेक यादव,पै.सुभाष उमाप,ॲड.विकास ढगे पाटील,पै.सुनील होळकर,गजानन गुळवे, फकीरा आदक, शिवाजी आदक, तानाजी राजगुडे,संजय पोखरकर,अक्षय वाळुंज,दिनकर आदक,रमेश आदक ,विजय राजगुडे, गणेश आदक,रामदास पालेकर,ॲड.अवधूततात्या राजगुडे, प्रकाश राजगुडे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळीं उपस्थित होते.
यावेळी निकाली कुस्त्यांचा आनंद कुस्ती शौकिनांनी लुटला. पंच म्हणून पै.गोरक्ष सासवडे,संतोष ढोकले,प्रमोद शिंदे यांनी काम पाहिले तर कुस्ती आखाड्याचे समालोचन राहूल केंजळे यांनी केले.
वडगावपीर (ता.आंबेगाव ) मानाची कुस्ती लावताना मान्यवर.