कसबे-सुकेणेत गोकुळ सोनवणे यांच्यावर मध्यपीकडून प्राणघातक हल्ला!!

कसबे-सुकेणेत गोकुळ सोनवणे यांच्यावर मध्यपीकडून प्राणघातक हल्ला!!
नाशिक – निफाड तालुक्यातील कसबे-सुकेणे येथे गोकुळ रामकृष्ण सोनवणे (४१)राहणार सोनवणे वस्ती मौजे सुकेणे येथील असून रात्रीच्या ९वाजेच्या सुमारास घरी जात असताना आठवडे बाजार परिसर ,ओझर रोड,वरील एक मोबाईल दुकान समोर मद्यधुंद अवस्थेत दोन युवक एक्टिवा स्कुटीवरून येत सोनवणे यांच्याशी शब्दिक वाद घालून अपशब्द वापरत दगडाने त्याच्या डोक्यावर मारून व बाटली फोडून ती पोटात मारणार पण सोनवणे यांनी प्रतिकार करत त्याच्या ही बाटली हातला लागल्याने गंभीर दुखापत झाली व मारहाण करण्यात आली त्यांची याआधी कोणाशी ओळख नसून सुद्धा
त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. दोन्ही आरोपींनी पळ काढला असून सध्या फरार आहे. तसेच सोनवणे यांच्यावर ओझर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राणघातक हल्ला झाल्याने कसबे-सुकेणे व मौजे.सुकेणे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे .अध्या प्रकारच्या घटना घडल्याने नागरिकांना मध्ये भीती पसरली आहे.
प्राणघातक हल्ला हा कुठल्याही आर्थिक लुटीसाठी केला नसून दहशत करणे याकरीता केल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच सनी कराटे, गुड्डू काळे असे हल्लेखोराचे नाव असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार गरुड,पोलीस शिपाई जालिंदर चौगुले,अजय मदने,संदीप बोडके, पोलीस नाईक दुर्गेश बैरागी आदी करत आहे.