पेठच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात अनंत सरोदे यांचे जंगलवारी व्याख्यान आणि स्लाईड शो!!

पेठच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात अनंत सरोदे यांचे जंगलवारी व्याख्यान आणि स्लाईड शो!!
पेठ येथील ग्रामीण आणि आदिवाशी मुलींना जंगल आणि वन्यप्राणी यांची ओळख व्हावी या उद्देशाने नासिकमधील सुप्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार अनंत (बाळा) सरोदे यांचे व्याख्यान आणि जंगलवारीचा स्लाईड शो नुकताच झाला. यावेळी विद्यालयाच्या बालीकांनी जंगलवारीची अनोखी अनुभूती घेतली.
पक्षीमित्र अनंत (बाळा) सरोदे यांचे आतापर्यंत जिल्ह्यातील विविध शाळेमध्ये ३५ जंगलवारीचे व्याख्यान आणि स्लाईड शो झालेले आहेत. त्यांच्या जंगलवारी या पुस्तकाचे अनावरण शिवसेना प्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालेले आहे. पेठ येथील जंगलवारीच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून निफाड येथील ग्रंथमित्र नईमखान पठाण उपस्थित होते. विशेष म्हणजे पाहुण्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यासाठी शाळेच्या मुलींनी स्वतः जवळ उपलब्ध असलेल्या पान आणि फुलांनी आपल्या चिमुकल्या हातानी बुके बनविली हॊती. यावेळी अनंत सरोदे यांनी नाशिकचे प्रसिद्ध वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आणि पक्षीतज्ञ सतीश गोगटे यांचे नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यावर आधारित पुस्तक कस्तुरबा शाळेला भेट दिले.
वाघ आहे तर जंगल आहे आणि जंगल आहे तर वाघ आहे. जंगल वाचवण्यासाठी निसर्गचक्रातील वाघ अत्यंत महत्वाचा दुआ आहे. म्हणून वाघ वाचले आणि वाढले पाहिजे, असे मत पक्षीमित्र अनंत सरोदे यांनी यावेळी व्यक्त केले. पाणी पिताना वाघ, शिकार करताना वाघ, आपल्या बच्चड्यांचा सांभाळ आणि काळजी घेणारा वाघ, क्रूर दिसणारा वाघ प्रत्यक्षात किती लाजाळू असतो हे मुलींनी अप्रत्यक्ष अनुभवले. वाघा बरोबरच गवा, हरीण, जंगली कुत्रे, रानटी ससे, विविध पक्षी त्यांचे आहार विहार यांची माहितीही जंगलवारीतिल अनंत सरोदे यांच्या ओघावत्या वानीने मुलींना मंत्रमुगध केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भदाने यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. श्रीमती टाकळकर मॅडम यांनी प्रस्ताविक करत पाहुण्यांचा परिचय करून दिला. तसेच श्रीमती सूर्यवंशी मॅडम यांनी आभार मानले. कार्यक्रमास श्रीमती देवरे मॅडम, श्रीमती गावीत मॅडम,नागपूरकरकर सर, श्री देशमुख सर श्रीमती लक्षमी महाले आणि इतर शिक्षक उपस्थित होते.
पेठच्या कस्तुरबा गांधी विद्यालयात जंगलवारी छायाचित्र स्लाईड शो मध्ये विद्यार्थांना मार्गदर्शन करताना पक्षीमित्र अनंत सरोदे समवेत नईमखान पठाण, शालेय शिक्षक व विद्यार्थी.