दत्तात्रय ऊस तोडणी व वाहतूक सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी श्री.बाळासाहेब बेंडे तर उपाध्यक्षपदी जनाबाई आजाब

दत्तात्रय ऊस तोडणी व वाहतूक सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी श्री.बाळासाहेब बेंडे तर उपाध्यक्षपदी जनाबाई आजाब
दत्तात्रयनगर,पारगाव (ता.आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना संलग्न संस्था असलेल्या दत्तात्रय ऊस तोडणी व वाहतूक सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी मा.बाळासाहेब बेंडे तर उपाध्यक्षपदी मा.जनाबाई आजाब यांची बिनविरोध निवड झाली आहे.
माजी सहकार मंत्री व कारखान्याचे संस्थापक दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय ऊस तोडणी व वाहतूक सहकारी संस्थेची सन २०२४-२५ ते २०२९-३० या कालावधीसाठी संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली. संस्थेच्या उपविधीप्रमाणे भीमाशंकर कारखान्याचे ६ संचालक व सभासदांमधून ७ संचालक असे १३ संचालकांसाठी बिनविरोध निवडणूक पार पडली. त्यामध्ये कारखाना प्रतिनिधी म्हणून कारखान्याचे संस्थापक दिलीपराव वळसे पाटील, चेअरमन बाळसाहेब बेंडे, संचालक रामचंद्र ढोबळे, दादाभाऊ पोखरकर, रामहरी पोंदे, पुष्पलता जाधव व सभासदांमधून व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, बाबासाहेब खालकर, आनंदराव शिंदे, गणपतराव इंदोरे, सुभाषराव मोरमारे, सखाराम घोडेकर, जनाबाई आजाब यांची संचालकपदी निवड झालेली आहे.
दि.२४ फेब्रुवारी २०२५ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी रमेश पाचारणे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी निवडीसाठी सभा आयोजित केली होती. त्यामध्ये संस्थेच्या उपविधीनुसार भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन हेच संस्थेचे चेअरमन राहतील अशी तरतूद असल्याने कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांची अध्यक्षपदी तर जनाबाई आजाब यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड पार पडली.