जवळे (ता.आंबेगाव) येथे लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजने संदर्भात माहिती व लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप!!

जवळे (ता.आंबेगाव) येथे लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजने संदर्भात माहिती व लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप!!
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण टप्पा क्रमांक २) अंतर्गत महाराष्ट्रातील २० लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र आणि १० लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात येत असून जवळे गावातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजने संदर्भात माहिती व लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप आदर्श सरपंच वृषाली उत्तम शिंदे पाटील, श्री रमेश शंकर भुजबळ (चेअरमन) यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपसरपंच सौ मनीषा टाव्हरे, संपर्क अधिकारी संतोष आचार्य सर, दत्तात्रय लायगुडे ,हरिचंद्र शिंदे, अमोल वाळुंज, चंद्रकला गायकवाड,प्रमिला गावडे ,संगीता साबळे, संगीता वाळुंज, शालन सोनवणे अंगणवाडी सेविका, सोनाली लोखंडे,शालन शिंदे, सीताबाई वाळुंज,दिपाली गावडे,निर्मला थोरात,अशोक सिरतर,निकेतन लायगुडे, सुनंदा शिंदे आशा वर्कर, ग्रामरोजगार सेवक भूपेंद्र वाळुंज, संजय वाळुंज,शरद खालकर,नारायण तांबे,बबनराव लोखंडे स्वस्त धान्य दुकानदार, रामचंद्र गावडे ,भूषण गावडे श्रीकांत वायकर, सुखदेव टाव्हरे, रीना वाळुंज, कविता शिंदे, सुनिता सोनवणे, संगीता डुकरे, अश्विनी वाघ, बाळासाहेब खालकर, बबनराव बोराटे, दिलीप एलबोर, शिवाजी लायगुडे,सचिन शिंदे,भरत गावडे ,पंढरीनाथ टाव्हरे, पोपट लायगुडे,उत्तम बोराटे, संजय लायगुडे, निवृत्ती शिंदे, अशोक लोखंडे,ई ग्रामस्थ उपस्थित होते.
घरकुल मंजूर होण्याचे आतापर्यंतचे सर्वात मोठे उद्दिष्ट सन 2024 -25 मध्ये मंजूर झालेले आहे.यामध्ये जवळे गावातील 13 घरकुले मंजूर झालेले आहेत.कार्यक्रमासाठी सर्व लाभार्थी आणि ग्रामस्थ/ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बालेवाडी पुणे येथील कार्यक्रमाचे लाईव्ह टेलिकास्ट ग्रामपंचायत कार्यालय जवळ या ठिकाणी प्रोजेक्टर वर दाखवण्यात आला.
गरजू कुटुंबांचे हक्काचे घर असावे या उद्देशाने केंद्र शासन व राज्य शासन राबवित असलेली ही योजना महत्त्वपूर्ण आहे. या योजनेमुळे अनेक कुटुंबांना सुरक्षित आणि सन्मानाने जगता येईल, तसेच त्यांची सामाजिक आणि आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल असे आदर्श सरपंच सौ.वृषाली उत्तम शिंदे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या अशी माहिती ग्रामपंचायत अधिकारी शीला साबळे यांनी दिली..