आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीसामाजिक

शिरदाळे(ता.आंबेगाव) येथील पाणीसाठा फक्त दिसण्यासाठी,दूषित पाण्यामुळे ग्रामस्थ त्रस्त!!

उन्हाळभर पाण्याची व्यवस्था करण्याची ग्रामपंचायत प्रशासन करणार पंचायत समिती प्रशासनकडे करणार मागणी करणार!!

शिरदाळे(ता.आंबेगाव) येथील पाणीसाठा फक्त दिसण्यासाठी,दूषित पाण्यामुळे ग्रामस्थ त्रस्त!!

उन्हाळभर पाण्याची व्यवस्था करण्याची ग्रामपंचायत प्रशासन करणार पंचायत समिती प्रशासनकडे मागणी !!

शिरदाळे,ता.आंबेगाव येथे दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून तळ्यात दिसणारा पाणीसाठा हा फक्त दिसण्यासाठीच आहे.या वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तळ्यात पाणीसाठा वाढला नाही.परिणामी रापलेला पाण्यातून दुर्गंधी यायला सुरुवात झाली।आहे. नळाद्वारे पाणीपुरवठा होणारी विहीर आटली असल्याने तळ्यातील बारव मधून पाणीसाठा आठवड्यातून एक दिवस सर्व नागरिकांना केला जातो.पण ते पाणी देखील इतके खराब असते की त्यातून अक्षरशः वास येत आहे.तेच पाणी फिल्टर ला सोडले जात आहे त्यामुळे फिल्टर मशीनचे कारटेज वारंवार खराब होत असून त्यामुळे नागरिकांना फिल्टर पाणी देखील वेळेवर मिळत नाही.त्यामुळे भर उन्हाळ्यात शिरदाळे ग्रामस्थांवर पाणी असून पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
प्रशासनाने या बाबतीत काहीतरी दखल घेऊन तात्पुरती सुविधा करावी या आशयाचे निवेदन लवकरच ग्रामपंचायतच्या वतीने पंचायत समिती आंबेगाव येथे देण्यात येणार असल्याचे सरपंच सौ.सुप्रिया मनोज तांबे, उपसरपंच बीपीन चौधरी,मा.सरपंच वंदना तांबे,मा.उपसरपंच मयुर सरडे,ग्रा.पं. सदस्य मोहिनी तांबे,कविता तांबे यांनी सांगितले.

याबाबतीतील ठराव मासिक सभेमध्ये पास करून त्याची प्रत पंचायत समितीला दिली जाईल. तसेच कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून लवकरच मा.दिलीपराव वळसे पाटील यांना देखील निवेदन देण्यात येणार असल्याचे मा.सरपंच मनोज तांबे,गणेश तांबे यांनी सांगितले.त्यातून शेतीला तसेच इतर वापरासाठी पाणी मिळावे ज्यामुळे आमची पाण्याची कायमस्वरूपीची काळजी मिटेल.तसेच पाणी जास्त प्रमाणावर दूषित असल्याने फिल्टर टाकी भरण्यासाठी जास्त वेळ लागतो.त्याचा बोजा देखील लाईट मीटरवर पडतो.शिवाय खराब पाणी असल्याने फिल्टर मशीन वारंवार खराब होत आहेत त्यामुळे त्याचा देखील तोटा ग्रामपंचायला सहन करावा लागत आहे.असेच पाणी जर फिल्टर ला सोडले तर फिल्टर माशील पूर्णपणे नादुरुस्त होऊन भंगारमध्ये निघेल असे फिल्टर पाणी सोडण्याचे काम करणारे निवृत्ती तांबे यांनी सांगितले.


सध्या तरी उन्हाळा तोंडावर असल्याने तात्पुरती सोय होण्याची गरज आहे.पाणी दूषित तर आहेच शिवाय त्यामुळे ग्रामस्थांचे आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे.तेच पाणी विहिरीला जात असते त्यामुळे नागरिक जास्त प्रमाणात त्रस्त असून लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करावी अशी विनंती शिरदाळे ग्रामपंचायत निवेदनाद्वारे करणार आहे.

रोजच्या दैनंदिन जीवनातील पाणी हा महत्वाचा घटक आहे. त्यामुळे सध्या तलावात पाणीसाठा दिसत आहे परंतु तो खूप दूषित झाला आहे.त्याची दुर्गंधी यायला लागली आहे.त्यामुळे ग्रामपंचायतच्या वतीने लवकरच पंचायत समितीला तसेच मा.वळसे पाटील साहेबांना निवेदन देऊन पाण्याची व्यवस्था करण्यासंदर्भात मागणी करण्यात येणार आहे. कारण ग्रामस्थांच्या रोज पाण्याबाबतच्या तक्रारी वाढल्या आहेत त्यामुळे यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
श्री.मयुर सरडे
(मा.उपसरपंच,ग्रा.पं. सदस्य शिरदाळे)
सौ. सुप्रिया मनोज तांबे
(सरपंच शिरदाळे)

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.