आंबेगाव तालुक्यातील दोन उच्चशिक्षित तरुणांनी ८ तासात केला ५५ किलोमीटर चा पायी प्रवास!!

आंबेगाव तालुक्यातील दोन उच्चशिक्षित तरुणांनी ८ तासात केला ५५ किलोमीटर चा पायी प्रवास!!
आंबेगाव तालुक्यातील शिरदाळे (धामणी)येथील जेष्ठ कार्यकर्ते व प्रगतीशील शेतकरी कै. मनाजीदादा काचोळे यांचे नातू श्री अशोकराव कोंडीभाऊ काचोळे व शिरदाळे येथील जेष्ठ कार्यकर्ते कै.नाना तांबे ( नाना मास्तर) यांचे पणतू व कै.नामदेव नाना तांबे यांचे नातू श्री.सुशांत राजेंद्र तांबे या दोघा जणांनी निगडी प्राधिकरण ते श्री.क्षेत्र म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिर धामणी हा जवळजवळ ५५ किलोमीटरचा पायी प्रवास सुमारे ८ तासात पूर्ण केला.
अशोक व सुशांत उच्च शिक्षित असून अशोकचा पिंपरी चिंचवड परिसरातील व्यावसायिक आहे तर सुशांत आयटी अभियंता आहे.अशोक यांने तो राहात असलेल्या त्याच्या निगडी प्राधिकरण येथून श्री मारुतीचे दर्शन घेऊन पहाटे ३.३० ला खंडोबाचे निमगावकडे चालण्यास सुरुवात केली तेथून तळवडे,बिरदवडी,चाकण एमआयडीसी भामफाट्यावरुन खरपुडी रेटवडी मार्गे खंडोबाच्या निमगावला पोहोचला. त्या ठिकाणी देवाचे दर्शन घेऊन त्यांच्याबरोबर सुशांत सामील झाला. व ते दोघे जण निमगाव वरुन निघून धामणटेक- गोसासी- कनेरसर-वरुडे- गाडकवाडी- शिकोबा मार्गे कुनाडीने धामणीच्या वरच्या खंडोबाचे दर्शन घेऊन २६ जानेवारीच्या प्रजाकसत्तादिना निमित्ताने राष्ट्रीय ध्वज फडकावला. व दुपारी तीन वाजता धामणी येथील श्री म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरात पोहोचले आणि दोघानी देवाचे दर्शन घेतले.
या दोघांच्या या उपक्रमाचे कौतुक तर आहेच परंतु त्यांनी या निमित्ताने आपल्या धामणी येथील खंडोबाभक्त तांबेबाबा हे शिरदाळ्याहून निमगावच्या खंडोबाचे दर्शनासाठी ज्या मार्गाने येजा करत होते त्याच मार्गाने पायी येऊन खंडोबाभक्त तांबेबाबाच्या अचाट भक्तीला साक्षात दंडवत घातलेला आहे हे खरोखर कौतुकास्पद!! सुशांत व अशोक हे सुट्टीच्या कालावधीत निरनिराळ्या भागातील दुर्गम व अवघड किल्ले,मंदिराना भेटी देत असतात.