खंडोबा देवस्थानाचा गाभारा झळाळला, भाविकांकडून दोन सागवानी दरवाजे अर्पण !

खंडोबा देवस्थानाचा गाभारा झळाळला
भाविकांकडून दोन सागवानी दरवाजे अर्पण !…
मंचर : धामणी ( तालुका आंबेगांव) येथील कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिराला दोन भाविकांनी उच्च दर्जाच्या सागवानी लाकडाचे व त्यावर जर्मन सिल्व्हर पत्र्याचे नक्षीदार आवरण घातलेले दोन दरवाजे कुलस्वामी खंडोबाला अर्पण केल्याचे ग्रामस्थ व सेवेकरी भगत, तांबे, वाघे वीर मंडळीनी सांगितले.
मुख्य मंदिराच्या आतील गाभार्यातील मोठा सागवानी दरवाजा देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचे पर्यावरण विषयाच्या मार्गदर्शक अभ्यास मंडळाचे सल्लागार सदस्य व जेष्ठ पर्यावरण तज्ञ डाँ विलासराव गोविंदराव वायकर (पणजी गोवा) यांनी तर दुसरा सागवानी दरवाजा धामणी ( तालुका आंबेगांव) येथील दशरथ भिमाजी बोर्हाडे व भोसरी येथील बोर्हाडे हाँस्पिटलचे संचालक डाँ प्रशांत दशरथ बोर्हाडे यांनी अर्पण केलेला असल्याचे खंडोबा देवस्थानाचे मुख्य पुजारी दादाभाऊ भगत,सुभाष तांबे,प्रभाकर भगत,धोंडीबा भगत,शांताराम भगत यांनी यावेळी सांगितले या दोन्ही सुबक कलाकुसरीचे सागवानी दरवाजे भिलारेवाडी (कात्रज पुणे) येथील प्रख्यात कारागीर राजू मिस्त्री आणि त्यांच्या सहकार्यांनी तयार केलेले आहेत मिस्त्री बंधू यांनी आळंदी व देहू येथील माऊलीच्या व तुकाराम महाराजाच्या आषाढी पालखी सोहळ्यातील रथाचे व पालखी तयार करण्याचे व दरवर्षी पाँलीश करण्याचे काम सेवाभावाने करत आलेले आहेत व करत असल्याचे सांगण्यात आले धामणीच्या खंडोबा मंदिरातील म्हाळसाकांताच्या मूर्तीभोवतालची प्रभावळ व सिंहासन व देवाच्या सागवानी पालखी तयार करण्याचे व त्यावरील जर्मन सिल्व्हरचे सुरेख नक्षीकाम मिस्त्री बंधू यांनी वीस वर्षापूर्वी केलेले असून त्यांनी यावेळी प्रभावळीला व सिंहासनाला तसेच पालखीला संपूर्ण पाँलीश विनामूल्य करुन दिले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले मंदिरात सागवानी दरवाजे व गाभार्यातील प्रभावळीला व सिंहासनाचे पाँलीश केल्यानंतर मंदिराचा गाभारा झळाळून गेला असल्याचे दर्शनासाठी येणार्या भाविकांनी यावेळी सांगितले