पारगाव (शिंगवे) येथे उत्साहात संपन्न झाला शिवजयंती सोहळा!!

पारगाव (शिंगवे) येथे उत्साहात संपन्न झाला शिवजयंती सोहळा!!
आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या पारगाव (शिंगवे) येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती,राजाधिराज, शिवछत्रपती, शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक माऊली असवारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचाराची प्रेरणा घेऊन स्वराज्य निर्मितीचे काम करणारे,महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती,धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली होती.या विचारानेच आपणही आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नेहमी सर्वांनी सोबत राहिले पाहिजे व गावाचा विकास साधला पाहिजे असे विचार उपस्थित सर्वांनी याप्रसंगी मांडले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने सरपंच श्वेता ढोबळे,ग्रामपंचायत सदस्य रोहिणी देवडे,नितीन ढोबळे,गीतांजली लोंढे, वीरेंद्र ढोबळे, उपसरपंच विठ्ठल ढोबळे, सदस्य किरण ढोबळे,बजरंग देवडे ,शिवाजी नाना ढोबळे, दत्तात्रय वाव्हळ,सोनबा ढोबळे, सुनील चांगण, दत्तात्रय ढोबळे, किसन ढोबळे, काशिनाथ ढोबळे, शंकर दातखिळे, सांगोलकर सर, हनुमंत चांगण,ज्येष्ठ नागरिक संघातील सर्व सभासद, ग्रामपंचायतचे कर्मचारी सुधीर ढोबळे बाळासाहेब भागवत उपस्थित होते.ग्रामविकास अधिकारी के.डी.भोजने यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.