मेंगडेवाडीत शिवजयंती उत्साहात साजरी!!

मेंगडेवाडीत शिवजयंती उत्साहात साजरी!!
आज १९ फेब्रुवारी अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांच्या जयंती निमित्ताने मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मारकाच्या चहुबाजूने आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आली होती तसेच महाराजांना पुष्पहार अर्पण करून “जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव” या अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे मा.चेअरमन तुकाराम भोर, युवा सेना जिल्हा समन्वयक सुनील गवारी, संचालक दशरथ मेंगडे, मा. ग्रा.पं. सदस्य रघुनाथ मेंगडे, मा. व्हाईस चेअरमन नवनाथ दांगट, अनिल मेंगडे, वनपाल दशरथ मेंगडे, सूर्यकांत मेंगडे, सागर रणपिसे, सुयोग मेंगडे, नामदेव मेंगडे, कौदरी मामा, ज्ञानेश्वर मेंगडे, मनोहर गवारी आधी मेंगडेवाडीतील ग्रामस्थ व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.