जारकरवाडी(ता.आंबेगाव) येथे डाळींब बागेला कपड्याचे आच्छादन!!

जारकरवाडी(ता.आंबेगाव) येथे डाळींब बागेला कपड्याचे आच्छादन!!
तीव्र उन्हापासून संरक्षण होण्यासाठी जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथील शेतकरी श्री. संतोष सावकार भोजने या शेतकऱ्यांने डाळिंब बागेचे संरक्षण करण्यासाठी पांढऱ्या कापडाचे (क्रॉप कव्हर) आच्छादन घातले आहे. यामुळे बागा पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत.
सध्याच्या वाढत्या तापमानामुळे फळबागांवर टांगती तलवार आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून फळबागांचे संरक्षण कारण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. पुणे जिल्ह्यातील डाळींब उत्पादक शेतकऱ्यांनी आच्छादन टाकण्यास सुरवात केली आहे. या आच्छादनाने तरी फळबागांना सुरक्षितता मिळण्यास मदत होईल, अशी आशा येथील शेतकऱ्यांना आहे.
वाढत्या उन्हाच्या तीव्र उष्णतेमुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसह इतर फळ बागायतदार शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू झाली आहे.
आंबेगाव तालुक्यात घोडनदी, डिंभे धरणाचा उजवा कालवा, डावा कालवा या माध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत पाणी उपलब्ध होत असल्याने या भागातील शेतकरी ऊस, कांदा या पिकांबरोबर फळबागांचे उत्पादन घेऊ लागला आहे.
सध्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना वाढत्या उन्हाचा देखील मोठा फटाका बसत आहे.भोजने यांनी साधारण आठ वर्षांपूर्वी दोन एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड केली आहे. वाढत्या उन्हापासून डाळिंबाची बाग संरक्षित करण्यासाठी आणि बदलत्या वातावरणाचा परिणाम होऊ नये म्हणून भोजने यांनी दोन एकर डाळिंब बागेला आच्छादन लावून बाग जगविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामुळे वाढत्या उन्हापासून डाळिंबाचे फळ वाचण्यास मदत होणार आहे. तसेच बाग वाचविण्यासाठी सुधारित पद्धतीच्या आच्छादनाचा वापर करता येत असल्याचे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांतून बोलले जात आहे.
डाळिंब उत्पादक शेतकरी तुकाराम भोसले म्हणाले की, डाळिंब बागांचे वाढत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी पांढऱ्या कपडाचे ( क्रॉप कव्हर ) गरजेनुसार जुन्या साड्या, कापड याचा वापर करतात. परंतु वादळी वारा, किंवा इतर नैसर्गिक संकटामुळे सद्य किंवा इतर कापड फाटून जाते. म्हणून चांगल्या प्रतीच किवा इतर कापड फाटून जात.म्हणून चांगल्या प्रतीच्या नेटचा वापर करुन डाळिंब बागेला अच्छादन देऊन फळबागा वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी मोठा खर्च येत आहे.शेतकरी वर्ग आपले पीक वाचविण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतो मात्र त्याला शासनाने साथ देणे गरजेचे आहे.