आरोग्य व शिक्षणसामाजिक

गावडेवाडी (ता.आंबेगाव) येथील हिरकणी विद्यालयात मुलींसाठी जागृती अभियान संपन्न!!

गावडेवाडी (ता.आंबेगाव) येथील हिरकणी विद्यालयात मुलींसाठी जागृती अभियान संपन्न!!

आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथील हिरकणी विद्यालयात शिवशक्ती फाऊंडेशन यांच्या वतीने सॅनिटरीपॅड अव्हेरणेसबाबत सत्र संपन्न झाले.

मंचर (ता.आंबेगाव ) येथील शिवशक्ती फाउंडेशन आयोजित व इनरव्हील क्लब यांचे सहकार्याने हिरकणी विद्यालय गावडेवाडी येथे सॅनिटरी नॅपकिन बद्दल जनजागृती अभियान घेण्यात आले. ‘कळी उमलताना या विषयावर डॉ. दीप्ती साळी यांनी मार्गदर्शन करून किशोरवयीन मुलींसोबत चर्चा करण्यात आली.

यावेळी शिवशक्ती महिला फौंडेशन व इनरव्हील क्लब यांनी मुलीसोबत मासिक पाळीचे महत्व व मुलींचा रोजच्या जीवनातील योग्य आहार व व्यायाम याचे महत्व समजावून सांगितले. विद्यार्थी व महिला शिक्षक यांनी कार्यक्रमास प्रतिसाद देऊन दिलखुलासपणे चर्चा केली.

यावेळी हिरकणी विद्यालयाचे प्राचार्य विनोद बोंबले,अध्यापिका मनिषा भोर,ज्योती दहितुले तसेच शिवशक्ती फौंडेशनचे पदाधिकारी अ‍ॅड. स्वप्ना पिंगळे/खामकर,इनरव्हील क्लब च्या अध्यक्ष डॉ. मेघा गाडे, डॉ.दीप्ती साळी,मनिषा चासकर,दिशा अभंग आदी उपस्थित होते.या कार्यक्रमास शेतकरी राजा उद्योग समुहाचे बाबाजी टेमकर यांच्या वतीने विद्यार्थांना खाऊ वाटप करण्यात आले. हिरकणी विद्यालयाच्या सर्व शिक्षक वृंद यांनी विशेष सहकार्य केले.

आदर्शगाव गावडेवाडी येथील हिरकणी विद्यालयात मुलींसाठी जागृती अभियान राबविण्यात आले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.