रिलायन्स हेल्थ इन्शुरन्सने आंबेगाव महोत्सव मध्ये दिला आरोग्य विषयक सामाजिक संदेश!!

रिलायन्स हेल्थ इन्शुरन्सने आंबेगाव महोत्सव मध्ये दिला आरोग्य विषयक सामाजिक संदेश!!
मंचर मध्ये सुरू असलेल्या आंबेगाव महोत्सव मध्ये रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स कंपनीने हेल्थ इन्शुरन्स बद्दल आरोग्य विषयक सामाजिक संदेश दिला आहे.लग्नात टीव्ही ,फ्रिज ,कपाट आदी चैनीच्या वस्तू देण्यापेक्षा मुलीला हेल्थ इन्शुरन्स द्या ज्यामुळे मुलीच्या आयुष्यात येणारा वैद्यकीय खर्च इन्शुरन्स कंपनी मार्फत दिला जातो.प्रसूती विमा घ्या आणि लग्नातील अनावश्यक खर्च टाळा असा सामाजिक संदेश रिलायन्स कंपनीने दिला आहे.
या इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधीत्व मंचर आंबेगाव चे रिलायन्स कार्यकारी गणेश पाचपुते,राजगुरूनगरच्या मनीषा विश्वासराव,सिद्देश विश्वासराव,नारायणगाव-आळेफाटा चे सचिन फुलसुंदर यांनी केले.
यावेळी रिलायन्स कंपनीचे क्लस्टर मॅनेजर नितीन ठुबे आणि सेल्स मॅनेजर गणेश शिंदे देखील उपस्तीथ होते.आंबेगाव महोत्सव मध्ये हेल्थ इन्शुरन्स चे महत्व पटवून दिले गेले.
त्याच प्रमाणे सर्वसामान्य व्यक्तीचे कुटुंब देखील इन्शुरन्स युक्त असावे आणि भारत सरकारच्या नियोजनानुसार २०४७ पर्यंत प्रत्येक घरी हेल्थ इन्शुरन्स हे उद्दिष्ट ठेऊन रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स काम करेल असं या महोत्सवात सांगण्यात आले.
रिलायन्स हेल्थ इन्शुरन्सचा स्टॉलला मा.सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, मा.खा.म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष विवेक दादा वळसे पाटील, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे,सौ.कल्पनाताई आढळराव यांनी भेट दिली.