आरोग्य व शिक्षण

काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथे शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती विविध उपक्रमांनी साजरी!!

काठापुर बुद्रुक ता.आंबेगाव या ठिकाणी शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.

आंबेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती काठापुर येथे शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी किल्ले शिवनेरी ते काठापुर शिवज्वोत यात्रा आयोजित करण्यात आली होती. त्याचप्रमाणे गावामधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखीतून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यावेळी सरपंच अशोक करंडे,उपसरपंच विशाल करंडे,प्रतिष्ठान चे अध्यक्ष हनुमंत थोरात,योगेश करंडे, बजरंग करंडे,संदीप जाधव, ऋषी करंडे ,चंद्रकांत करंडे, सोमनाथ करंडे, अमोल करंडे मुख्याध्यापक नंदकुमार चासकर,रविंद्र विधाते ,निलीमा वळसे,संजय घोटकर ,दिनेश तुळे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थीही सहभागी झाले होते .यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.