वाळुंजनगर(लोणी) येथील गणेश मंदिरात संकष्ट चतुर्थी निमित्त आकर्षक सजावट!!

वाळुंजनगर(लोणी) येथील गणेश मंदिरात संकष्ट चतुर्थी निमित्त आकर्षक सजावट!!
आंबेगाव तालुक्यातील गणेश मंदिर वाळुंजनगर(लोणी ) या ठिकाणी प्रत्येक संकष्टी चतुर्थीला विविध कार्यक्रमांचे आयोजन करून सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.ही परंपरा गेले १४ वर्षापासून चालु आहे.
संकष्टी चतुर्थी निमित्त महाप्रसादाची सुरुवात वाळुंजनगर गावचे मा. ग्रामपंचायत सदस्य श्री.बाळासाहेब देवराम वाळुंज यांनी केली.ती मंडळाच्या सर्व सदस्यांनी,अध्यक्षांनी आजपर्यंत कायम ठेवली आहे.
परिसरातील भाविक चतुर्थी निमित्त गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी करतात. आजची चतुर्थी श्री भैरवनाथ विविध सहकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक तान्हाजीशेठ पांडुरंग वाळुंज,भिमाजी शांताराम वाळुंज, आणि संजय गणपत वाळुंज या मान्यवरांनी आयोजन केली आहे.
मंदिरातील सजावट पराग कारखान्याचे अधिकारी आदिनाथ वाळुंज आणि सनी वाळुंज यांनी केली अशी माहिती उद्योजक जयेश वाळुंज आणि मंडळाचे अध्यक्ष अशोक वाळुंज,मनोज वाळुंज,गुलाब वाळुंज यांनी दिली.