आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव(खडकी) येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना,पुणे जिल्हा नियोजन समिती अंतर्गत स्मशानभूमी परिसर सुधारणा कामांचा शुभारंभ!!

आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव(खडकी) येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना,पुणे जिल्हा नियोजन समिती अंतर्गत स्मशानभूमी परिसर सुधारणा कामांचा शुभारंभ!!
शिवसेना उपनेते, मा.खा. शिवाजीराव (दादा)आढळराव पाटील यांच्या मागणीनुसार,महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे व पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री मा.ना.चंद्रकांत (दादा) पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव(खडकी) गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना व पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी मंजूर केला होता.
पुणे जिल्हा नियोजन समितीने १० लक्ष रूपये निधीतून मंजूर केलेल्या स्मशानभूमी परिसर सुधारणा ह्या कामाचा शुभारंभ जेष्ठ नेते विठ्ठल पोखरकर माडीवाले यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, शिवसेना शाखाप्रमुख कैलास पोखरकर, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामदासशेठ बांगर, मा.सरपंच निवृत्तीशेठ बांगर, पोलीस पाटील बबुशा वाघ, मा.ग्रामपंचायत सदस्य अनिल पोखरकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते अशोक बांगर, नवनाथ बांगर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.